43 हजार नवमतदार बजावणार प्रथमच मतदानाचा हक्क
43 हजार नवमतदार बजावणार प्रथमच मतदानाचा हक्क
ठाणे दि. 26(जिमाका): लोकसभा निवडणूकीसाठी मतदार याद्यांना अंतिम स्वरुप देण्याचे काम सुरु असून ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक मतदार हे 40 ते 49 या वयोगटातील आहेत. त्यांची संख्या 15 लाख 63 हजार 210 इतकी आहे. सर्वात तरुण म्हणजेच 18 ते 19 वर्षे या वयोगटातील व जे प्रथमच मतदानाचा हक्क बजावतील असे मतदार हे 43 हजार 758 इतके आहेत. तर 1 लाख 32 हजार 750 मतदार हे वयाची 80 वर्षे पार केलेले असणार आहेत.
या संदर्भात प्राप्त माहितीनुसार, ठाणे जिल्ह्यात वयोगटनिहाय मतदार संख्या याप्रमाणे आहे.
वय वर्षे 18 ते 19 दरम्यान म्हणजेच नवमतदार हे 43 हजार 758 असून त्यात 26 हजार 45 पुरुष व 17 हजार 713 महिला आहेत.
तर 20 ते 29 वर्षे या वयोगटातील 8 लाख 99 हजार 352 मतदार असून त्यात 5 लाख 18 हजार 484 पुरुष आणि 3 लाख 80 हजार 745 महिला व 123 इतर मतदार आहेत.
वय वर्षे 30 ते 39 दरम्यान असणारे मतदार हे 14 लाख 71 हजार 279 असून त्यात 7 लाख 93 हजार 181 पुरुष 6 लाख 77 हजार 970 महिला आणि 128 इतर मतदार आहेत.
वय वर्षे 40 ते 49 या वयोगटातील मतदार हे 15 लाख 63 हजार 210 असून त्यात 8 लाख 29 हजार 18 पुरुष तर 7 लाख 34 हजार 130 महिला मतदार असून 62 मतदार हे इतर गटातील आहेत.
वयोगट 50 ते 59 वर्षे असलेल्या मतदारांची संख्या 10 लाख 95 हजार 426 असून त्यात 5 लाख 91 हजार 744 पुरुष तर 5 लाख 3 हजार 660 महिला व 22 इतर आहेत.
ज्येष्ठ नागरिक म्हणून संबोधले जाणारे वय वर्षे 60 ते 69 या गटात 6 लाख 13 हजार 629 मतदार असून त्यात 3 लाख 44 हजार 41 पुरुष तर 2 लाख 69 हजार 584 महिला व 4 इतर मतदार आहेत.
70 ते 79 या वयोगटात 2 लाख 73 हजार 683 मतदार असून त्यात 1 लाख 49 हजार 934 पुरुष असून 1 लाख 23 हजार 748 महिला आणि एक इतर मतदार आहेत.
80 वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील मतदार हे 1 लाख 32 हजार 750 असून त्यात 69 हजार 343 पुरुष तर 63 हजार 407 महिला मतदार आहेत.
00000
Comments
Post a Comment