निवडणूक काळात शस्त्रे बाळगण्यास मनाई
ठाणे दि. 14(जिमाका):भारत निवडणूक आयोगाने लोकसभा
सार्वजनिक निवडणूक 2019 कार्यक्रम जाहीर केला असुन 10 मार्च पासुन आदर्श आचार
संहिता लागु झाली आहे.या अनुषंगाने ठाणे शहर
आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात 23 भिंवडी ,24 कल्याण ,25 ठाणे अशा तीन लोकसभा
मतदार संघात दि. 29 एप्रिल रोजी मतदान व दि.23 मे रोजी
मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. या लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या कालावधीत
कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या सर्व पोलीस
स्टेशन हद्दीतील शस्त्रे परवानाधारकांना शस्त्रे ताब्यात ठेवण्यास व बाळगण्यास दि.
23 मे पर्यंत मनाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त ठाणे शहर विवेक फणसाळकर यांनी दिले
आहेत. या मनाई आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.
00000
Comments
Post a Comment