अवैध मद्यसाठे उध्वस्त; पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

वैध मद्यसाठे उध्वस्त; पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
ठाणे दि. 26(जिमाका): आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमिवर राज्य उत्पादन शुल्क विभाग डोंबिवली,जि.ठाणे व पोलीस उपअधिक्षक कल्याण यांनी केलेल्या वेगवेगळ्या कारवायांमध्ये सुमारे तीन लाख रुपयांचे अवैध मद्यसाठे व ते बनविण्यासाठी लागणारी सामुग्री जप्त करुन नष्ट केली आहे.
यासंदर्भात अधिकृत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, राज्य उत्पादन शुल्क विभागाने  दि.23 रोजी हेदुटने गावनदी किनारीता.कल्याण .जि.ठाणे येथे छापा टाकून दोन ठिकाणी कार्यवाही केली. त्यात 6600 लिटर रसायन   लोखंडी बॉयलर ढोल =१०००x, प्लास्टिक ड्रम रसायनाणे भरलेले =३३x२००लिटर असा एकूण  लाख ४८ हजार २००रुपयांचा मुद्देमाल जप्त केला . तसेच उपअधिक्षक कल्याण यांनी व अंबरनाथ पोलीसांच्या सह आज दि.26 रोजी  चिंचपाडा गाव व मनेरा गाव येथे  दोन ठिकाणी छापे मारुन गावठी दारुचे अड्डे उद्ध्वस्थ केले. या कारवाईत 5500 लिटर रसायन, दोन ड्रम, प्लास्टिक टाक्या असे सुमारे 1 लाख 51 हजार 100 रुपयांचे साहित्य जप्त केले. ही कारवाई विठ्ठलवाडी पोलीसस्टेशनच्या हद्दीत करण्यात आली, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. 
00000

Comments

Popular posts from this blog

जिल्ह्यातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घ्यावी

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांची शहापूर तालुक्यातील शेणवा प्राथमिक आरोग्य केंद्रास “सरप्राईज व्हिजिट”

विशेष लेख क्र.33 - जिल्हाधिकारी अशोक शिनगारे: लोकसेवेचा दीपस्तंभ