आयुर्वेदाद्वारे आरोग्य संवर्धन व मधुमेह प्रतिबंध याविषयावर आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण
आयुर्वेदाद्वारे आरोग्य संवर्धन व मधुमेह प्रतिबंध
याविषयावर आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण
ठाणे, दि.27 (जिमाका)- राष्ट्रीय आयुष अभियान अंतर्गत, आशा स्वयंसेविका व ए.एन.एम. यांना ‘आयुर्वेद व योग
द्वारा, मधुमेह सहित आरोग्य संवर्धन व सामान्य आजारांवर प्रतिबंधात्मक उपाय’ याबाबतचे, ‘प्रशिक्षणार्थींचे
प्रशिक्षण’ घेण्यात आले. सदरचे 2 दिवसांचे प्रशिक्षण (23-24 मार्च) आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र ठाणे येथे
संपन्न झाले.
प्रशिक्षणाचे उद्घाटन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिष रेंघे व अति.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.महेश
नगरे यांच्या हस्ते झाले.
या प्रशिक्षणामध्ये हे एकूण 20 प्रशिक्षणार्थींनी प्रशिक्षण घेतले, त्यामध्ये जिल्हा परिषदेमधील दहा वैद्यकीय
अधिकारी व 7 आयुर्वेद महाविद्यालयांमधील प्राध्यापक मंडळी व 3 आयुष वैद्यकीय अधिकारी यांनी प्रशिक्षण घेतले.
या प्रशिक्षणामध्ये विविध वक्त्यांनी वेगवेगळ्या विषयावर व्याख्यानं दिली. त्यामध्ये ते डॉ.व्यंकट धर्माधिकारी यांनी
विविध विषयांवर विस्तृतपणे अभ्यासपूर्ण व्याख्याने दिली. तसेच निष्णात वैद्य महेश ठाकूर व डॉ. गोरक्ष आव्हाड ,
डॉ.निशांत पाटील, डॉ. निरंजन कुलकर्णी यांनी देखील व्याख्यानं दिली.
यापुढील टप्प्यांमध्ये हे सदर जिल्हास्तरीय प्रशिक्षक, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी जाऊन आशा व
एएनएम यांना प्रशिक्षित करणार आहेत. ठाणे जिल्ह्यामध्ये एकूण 33 प्राथमिक आरोग्य केंद्र असून आशा व ए.एन.एम
यांची एकूण संख्या 1365 अशी आहे. या सर्वांचे प्रशिक्षण मार्च व एप्रिल महिन्यामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.
मनिष रेंगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती आरोग्य विभागामार्फत देण्यात आली.

Comments
Post a Comment