निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय परिसरात मनाई आदेश
ठाणे दि. 30(जिमाका):
लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला असून मंगळवार दि. 2 एप्रिलपासून नामनिर्देशन
अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होत आहे. त्याअनुषंगाने निवडणूक निर्णय अधिकारी
कार्यालयाच्या चहुबाजूने 100 मीटर परिसरात कलम 144( 2) अन्वये पोलीस
आयुक्त ठाणे शहर विवेक फणसळकर यांनी मनाई आदेश दिले आहेत. या अन्वये
या परिसरात कोणत्याही पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते , प्रतिनिधी यांना उमेदवारी
अर्ज दाखल करतांना सभा, बैठक, पत्रकार परिषद
आदी कार्यक्रम घेण्यास प्रतिनंध करण्यात आला आहे. तसेच उमेदवारी अर्ज दाखल करतांना
उमेदवार व त्यांचे समवेत चार व्यक्तिंनाच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कक्षात प्रवेश
देण्यात येईल व कार्यालय परिसरात फक्त तीन वाहने आणण्याची परवानगी देण्यात येत असल्याचे पोलीस आयुक्त
विवेक फणसळकर यांनी कळविले आहे. या मनाई आदेशाचा भंग केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही
देण्यात आला आहे.
Comments
Post a Comment