फ्रिसेल केरोसिनची उपलब्धता
ठाणे दि. 31 (जिमाका): फ्रिसेल केरोसीन (सफेद
केरोसीन) च्या साठवणूक, वाहतुक व विक्रीवरील
निर्बंध उठवण्यात आले आहेत. त्यामुळे ठाणे शिधावाटप
क्षेत्रातील कार्यरत घाऊक केरोसीन परवानाधारकांना फ्रि सेल केरोसिन (सफेद
केरोसिन) उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तरी संबंधित तेल कंपनीकडून फ्रि सेल केरोसिन उचल करुन ठाणे शिधावाटप क्षेत्रातील इच्छुक
दुकानांना पुरवठा करण्यात येणार आहे.तरी इच्छुक ग्राहकांनी लाभ
घ्यावा असे आवाहन उपनियंत्रक शिधावाटप नरेश वंजारी यांनी
केले आहे.
Comments
Post a Comment