सायकल रॅलीतून दिला मतदानाचा संदेश
सायकल रॅलीतून दिला मतदानाचा संदेश
ठाणे दि. 21(जिमाका)- लोकसभा निवडणूक 2019 च्या अनुषंगाने मतदारांना मतदानासाठी आवाहन करण्यासाठी स्वीप उपक्रमाअंतर्गत
जनजागृतीचे अनेक उपक्रम जिल्हाभरात राबविण्यात येत आहेत. आज ठाणे शहरातून मतदार जनजागृतीसाठी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. या
रॅलीत सहभागी होत ठाणेकर सायकलपटूंनी मतदानाचा संदेश दिला.
आज सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील
शासकीय विश्रामगृहासमोरुन या रॅलीस सुरुवात झाली. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर, पोलीस आयुक्त विवेक फणसेकर, ठाणे
लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निरीक्षक शैली क्रीशनानी, स्वीप
उपक्रमाच्या नोडल अधिकारी रेवती गायकर व उपजिल्हा निवडणूक अधिकारी अपर्णा सोमाणी,
ज्येष्ठ सायकलपटू श्यामसुंदर केसरकर, देविदास ठोंबर तसेच अन्य अधिकारी, कर्मचारी व सायकलपटू मोठ्या
संख्येने उपस्थित होते.
श्रीमती क्रीशनानी व जिल्हाधिकारी नार्वेकर
यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅली रवाना करण्यात आली. ही रॅली चिंतामणी
ज्वेलर्स, गडकरी रंगायतन, साईकृपा हॉटेल, राममारुती रोड, गोखले रोड, टेलिफ़ोन
सर्कल, प्रशांत कॉर्नर, अलमोडा सिग्नल, खोपट सिग्नल मार्गे जिल्हाधिकारी
कार्यालयात समारोप करण्यात आला.
00000
Comments
Post a Comment