डोंबिवली शहरात वाहतुक मार्गात बदल
डोंबिवली शहरात वाहतुक मार्गात बदल
ठाणे दि.24(जिमाका): शहर वाहतुक शाखेच्या डोंबिवली शाखेत गुरुवार दि.25 रोजी
डोंबिवली पुर्व भागात वाहतुक मार्गात बदल करण्यात आला आहे.आप्पा दातार चौक येथे
आयोजित निवडणुक प्रचार सभेनिमित्त हा बदल करण्यात आले आहेत.या बदलानुसार गणपती
मंदिर रोड,छेडा रोड,फडके रोड,मदन ठाकरे चौक,आप्पादार चौक,बाजीप्रभू चौक,आगरकर
रोड,एच,डी,एफ,सी बॅकेसमोरील रोड येथे वाहतुक कोंडी निर्माण होऊ नये म्हणुन फडके
रोड कडे येणाऱ्या सर्व वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.त्यामुळे ठाकुर्ली
जोशी हायस्कुल समोरील रोडने येणारी वाहने नेहरु रोड मार्गे स्टेशन परिसरात
जातील.तर फडके रोड कडे येणारी वाहने टिळक रोडने,सावरकर रोडने इंदिरा चौक मार्गे
स्टेशन परिसरात जातील.तसेच सरद प्रचार सभेसाठी येणाऱ्या वाहनांच्या पार्कीगची
व्यवस्था नेहरु मैदान येथे करण्यात आली आहे.ही अधिसुचना गुरुवार दि.25 रोजी सकाळी
6 ते रात्री 10 पर्यंत लागु असुन या आधिसुचनेतुन पोलीसांची वाहने ,फायर
ब्रिग्रेड,रुग्णवाहिका व अन्य अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले आहे,असे पोलीस उप
आयुक्त अमित काळे यांनी कळवले आहे.
Comments
Post a Comment