आधी मतदान मग सुटी- जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर प्रशासनाची निवडणूक सज्जता
आधी मतदान
मग सुटी- जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर
प्रशासनाची निवडणूक सज्जता
ठाणे, दि.27 (जिमाका)- ठाणे जिल्ह्यातील निवडणूक
यंत्रणा मतदानासाठी सज्ज असून सर्व तयारी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यात
मतदारांमध्ये जनजागृतीची मोहिमही मोठ्या प्रमाणावर राबविण्यात आली असून सलग सुट्या
असल्या तरी नागरिकांनी आधी मतदानाचे राष्ट्रिय कर्तव्य पार पाडून मगच सुटीचा आनंद
लुटावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी
राजेश नार्वेकर यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत केले.
लोकसभा
निवडणूक 2019 च्या अनुषंगाने प्रशासनाच्या सज्जतेबाबत माहिती
देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी
25 ठाणे लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार,
23 भिवंडी लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी किसन जावळे
, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अपर्णा सोमाणी आदी उपस्थित होते.
ठाणे जिल्ह्यात सोमवार दि. 29/04/2019 रोजी सकाळी 7.00 ते सायंकाळी 6.00 वाजेपावेतो
मतदान घेण्यात येणार आहे. यावेळी माहिती
देण्यात आली की,
जिल्ह्यात 23- भिवंडी, 24- कल्याण, 25- ठाणे हे तीन लोकसभा मतदार संघ आहेत. जिल्ह्यात एकूण 62 लक्ष
25 हजार 194 इतके एकूण मतदार आहेत. त्यात 31 लक्ष 19 हजार 850 पुरुष, 31 लक्ष 4 हजार 898 महिला तर 446 इतर मतदार आहेत.
जिल्ह्यात एकूण
मतदान केंद्र- 6715 असून मतदानासाठी आवश्यक
मतदान यंत्रे BU-13 हजार 450, CU-
8033, VVPAT- 8700 उपलब्ध आहेत. याशिवाय मतदानासाठी आवश्यक मनुष्यबळाचीही जय्यत तयारी आहे. त्यासाठी 6853 टिम तयार केल्या आहेत. त्यात 27 हजार 412 कर्मचारी
असून
1557 राखीव कर्मचारी आहेत. असे एकूण 28 हजार 969 इतके मनुष्यबळ उपलब्ध आहे.
मतदान
कर्मचाऱ्यांची लोकसभा मतदारसंघ निहाय उपलब्धता याप्रमाणे- भिवंडी-2200 मतदान केंद्र 9889 कर्मचारी,कल्याण- 2063 मतदान केंद्र 8574 कर्मचारी, ठाणे- 2452 मतदान
केंद्र
10506 कर्मचारी उपलब्ध आहेत. हे सर्व कर्मचारी उद्या दुपार पर्यंत आपापल्या मतदान
केंद्रावर मतदान साहित्य घेऊन पोहोचतील.तसेच सर्व मतदान
केंद्रांवर पिण्याचे पाणी, सावली, दिव्यांग
मतदारांसाठी व्हील चेअर आदी सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. प्रत्येक मतदान केंद्रांवर यंदा तीन रांगा असतील. पुरुष , महिला
मतदारांसाठी एक एक रांग तर तिसरी रांग ही
दिव्यांग मतदार, ज्येष्ठ मतदार, गरोदर माता आदींसाठी असेल. प्रत्येक मतदान
केंद्रावर प्रथमोपचार पेटी देण्यात आली असून त्यात पॅरेसिटॅमॉल, रॅंटक, बॅण्डएड, ऑआरएस पाकीटे व कॉटन बॅंडेज इ. साहित्य पुरविण्यात आले आहे.
मतदानासाठी आवश्यक असलेले सर्व साहित्य जसे ईव्हीएम, व्हीव्हीपॅट, लिफाफे, पक्की शाई, आवश्यक स्टेशनरी
हे प्राप्त झाले असून त्या त्या
विधानसभा क्षेत्रनिहाय वितरीत करण्यात आले आहे.
मतदान
केंद्रांवर कर्मचारी व साहित्याची ने आण करण्यासाठी 1262 बसेस,
1370 जीप, 30 टेम्पो ट्रॅव्हलर, 45 ट्रक, 265 कार, रिक्षा अशा
एकूण
2972 वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे.
जिल्ह्यात
सुरक्षा व्यवस्थेत 12 पोलीस उप आयुक्त एक अपर पोलीस अधिक्षक, 25 पोलीस उप अधिक्षक, 126 पोलीस निरीक्षक, 679 सपोनि किंवा उपनिरीक्षक,10 हजार
75 कर्मचारी शिवाय 3369 होमगार्ड, राज्य राखीव
पोलीस दलाच्या 49 तुकड्या तर केंद्रीय राखीव
पोलीस दलाच्या 42 तुकड्या यांचा समावेश आहे.
प्रतिबंधात्मक
कारवाई व आचारसंहिता पथकांनी केलेली कारवाई
2 कोटी 33 लाख 36 हजार 406 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.
78 अवैध शस्त्रे
जप्त करण्यात आलीत. तर 5845 परवानाधारी
शस्त्रांपैकी 4504 जमा करण्यात आले आहेत. तर 44 दारुगोळा
पकडण्यात आला आहे.
याशिवाय 5 कोटी 37 लाख 69 हजार 235 रुपये
किमतीचे अवैध मद्य व ड्रग पकडण्यात आले आहे.
आचारसंहिता पथकांची कारवाई- 28 तक्रारी
आल्या.
5 ठिकाणी गुन्हे दाखल, निकाली केसेस 7, प्रलंबित केसेस 16 .
जिल्ह्यात सखी
मतदान केंद्र, सक्षम मतदान केंद्र असे उपक्रमही
राबविण्यात येत आहे. अशी माहितीही
यावेळी देण्यात आली आहे. नागरिकांनी
आपले आयोगाने मंजूर केलेल्या दस्ताऐवजांपैकी कोणतेही एक दस्तऐवज सोबत घेऊन मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले.
०००००
Comments
Post a Comment