डोंबिवली शहरात वाहतुक मार्गात बदल
डोंबिवली शहरात वाहतुक मार्गात बदल
ठाणे, दि.28 (जिमाका)- लोकसभा निवडणूक 2019 च्या
अनुषंगाने आय.ई.एस. पाटकर विद्यालय, आयरे रोड डोंबिवली पुर्व येथे निवडणूक
कामकाजासाठी साहित्य वितरण व नंतर जमा केले जाणार आहे. दि.28 ते दि.30 या दरम्यान
हे काम होणार आहे.त्यामुळे या ठिकाणी वाहनांची गर्दी होऊन रहदारीची कोंडी निर्माण
होऊ शकते. नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून शहरातील रहदारीच्या मार्गात बदल
करण्यात आले आहेत.
यासंदर्भात ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या
वाहतुक विभागाचे उप आयुक्त यांनी जारी केलेल्या अधिसुचनेनुसार, राजाजी पथ गल्ली/
लेन नं 2 या रस्त्याच्या दोन्ही बाजूने व जुना आयरेरोड राजाजी पथ गल्ली/ लेन नं 1
ते मदन ठाकरे रोड दोन्ही बाजूने सर्व वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
पर्यायी मार्ग- या कालावधीत सर्व वाहने राजाजी पथ गल्ली नं 1
चिपळूणकर रोडने एस. के. चौक टंडन रोड, म्हाळगी चौक मार्गे स्टेशन परिसरातून इच्छित
स्थळी जातील.
या
कालावधीत राजाजी पथ गल्ली/ लेन नं 2 या रस्त्याच्या दोन्ही बाजूने व जुना आयरेरोड
राजाजी पथ गल्ली/ लेन नं 1 ते मदन ठाकरे रोड दोन्ही बाजूने पार्किंग रद्द करण्यात
आली असून त्याऐवजी राजाजी पथ रोडावरील स्वामी नारायण मंदिर रोडा
ते रामनगर पोलीस ठाणे येथे पार्कींग
करण्यास सवलत देण्यात आली आहे.
सदर
अधिसुचना दि.28 ते दि.30 रोजी सकाळी सहा पर्यंत लागू राहिल. या अधिसुचनेतून पोलीस,
अग्निशमन वाहने, रुग्णवाहिका व अन्य अत्यावश्यक सेवेतील वाहनाना वगळण्यात आले आहे,
असे वाहतुक विभागाचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी कळविले आहे.
000000
Comments
Post a Comment