राजीव गांधी चौक-जिलानीवाडी रस्त्यावर सम-विषम तारखेनुसार पार्किग


राजीव गांधी चौक-जिलानीवाडी रस्त्यावर सम-विषम तारखेनुसार पार्किग
ठाणे दि.24(जिमाका):ठाणे महानगरपालिका हद्दीत वागळे वाहतुक उपविभागात राजीव गांधी चौक ते जिलानीवाडी या भागात अर्जुन पार्क सोसायटी(रोड नं.10) समोरील रस्त्यावर होणाऱ्या वाहन पार्किंगमुळे वाहतुक कोंडी होत असते.त्यामुळे सदर रस्ता  वर 10 रोडच्या डाव्या बाजुस पी -1 प्रमाणे विषम
 तारखेस आणि अर्जुन पार्क सोसायटी (रोड नं.10 )समोरील रोडच्या उजव्या बाजुस पी-2 प्रमाणे सम तारखेस दुचाकी व हलक्या वाहनांना पार्किंग साठी परवानगी देण्याचे आदेश पोलीस उप आयुक्त शहर वाहतुक विभाग ठाणे शहर अमित काळे यांनी वाहतुक नियंत्रण अधिसुचनेद्वारे दिले आहेत.सदर पार्किंग व्यवस्था ही 15 दिवसांसाठी प्रायोगिक तत्वावर आहे.या संदर्भात नागरीकांनी आपली हरकत-सुचना लेखी स्वरुपात पोलीस उप आयुक्त,शहर वाहतुक शाखा कार्यालय,तीन हात नाका,ठाणे 400602 येथे पाठवाव्या.हरकत सुचना न आल्यास पुढील आदेश होईपर्यत हेच आदेश अंमलात राहतील,असेही कळविण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

भुवनेश्वर येथे पार पडलेल्या ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये ठाण्याच्या साईशा पवारने हर्डल्स शर्यतीत पटकाविले 'रजत पदक'

महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कारांवर कोकण व मुंबई प्राधिकरण विभागाची मोहोर

भिवंडी तालुक्यातील पडघा येथे 21 सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत स्तरावरील आर्थिक समावेशन सॅच्युरेशन शिबिराचे आयोजन