लोकसभा निवडणूक २०१९:अद्यावत संनियंत्रणासाठी सुसज्ज नियंत्रण कक्ष कार्यान्वित


ठाणे,दि.२८(जिमाका)- लोकसभा निवडणुकीसाठी उद्या (सोमवार दि.२९) मतदान होणार आहे. त्यासाठी प्रशासनाची सर्व जय्यत तयारी सूरु असतांनाच या सर्व प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात सुसज्ज नियंत्रण कक्ष स्थापन करून कार्यान्वित करण्यात आला आहे.
मतदान व एकूणच निवडणूक प्रक्रियेशी संबंधीत सर्व बाबींचे संनियंत्रण या कक्षातून होणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात हा कक्ष कार्यान्वित झाला असून या ठिकाणी सुसज्ज अत्याधुनिक यंत्रणा उभारण्यात आली आहे. या ठिकाणी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर हे स्वतः जातीने लक्ष ठेवतील.
आजपासून सर्व निवडणूक कर्मचाऱ्यांची पथके मतदान साहित्यासह मतदान केंद्रांकडे रवाना झाले. तिथपासून ते उद्या मतदान यंत्रे स्ट्रॉंग रूममध्ये जाई पर्यंत हे सनियंत्रण होईल.या सनियंत्रण कक्षात २३-भिवंडी,२४-कल्याण,२५-ठाणे या तिन्ही मतदार संघाचे सनियंत्रण होत आहे.
यात प्रामुख्याने मतदान प्रक्रिया, सुविधा सेवा, सी व्हिजिल ऍप, १९५० हेल्पलाईन नंबर, जिल्ह्यातील ६७१ मतदान केंद्रांचे वेब कास्टिंग, निवडणूक कामासाठी वापरात असलेल्या वाहनांचे जीपीएस मोनिटरिंग,तसेच वेळोवेळी करावयाचे सर्वप्रकारचे ऑनलाईन रिपोर्टिंग या सुविधा सज्ज आहेत.
१९५० या हेल्पलाईन नंबर वर मतदारांना माहिती देण्यासाठी प्रत्येक लोकसभा मतदारसंघनिहाय एकूण ३ कॉल सेंटर तयार करण्यात आले आहेत.तसेच प्रत्येक मतदारसंघ निहाय सर्व बाबींचे सनियंत्रण करण्याची सुविधा निर्माण करण्यात आली आहे.
प्रत्येक मतदान केंद्रनिहाय नेमण्यात आलेले झोनल अधिकारी दर दोन तासाला अपलोड करणारे रिपोर्ट्स, त्यानंतर सहा.निवडणूक निर्णय अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी ते जिल्हा निवडणूक अधिकारी या प्रक्रियेत समाविष्ट असतील.ही प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राज्य निवडणूक यंत्रणेशी जोडलेली असेल. या सर्व प्रक्रियेवर उप जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती अपर्णा सोमाणी यांच्यासह तहसीलदार नागोराव लोखंडे, अर्चना कोळी,तीन नायब तहसीलदार रोहिदास चौधरी,राजश्री पेडणेकर, मृणाल कदम तसेच सहायक जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी नरेंद्र भामरे यांचा जागता पहारा आहे. आणि स्वतः जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर या ठिकाणी सनियंत्रण करतील.

Comments

Popular posts from this blog

जिल्ह्यातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घ्यावी

गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांची शहापूर तालुक्यातील शेणवा प्राथमिक आरोग्य केंद्रास “सरप्राईज व्हिजिट”