मतदार जनजागृतीसाठी आज (रविवारी) सायकल रॅली
ठाणे दि.२०(जिमाका)- लोकसभा निवडणूक 2019 च्या अनुषंगाने मतदारांना मतदानासाठी आवाहन करण्यासाठी स्वीप उपक्रमाअंतर्गत
जनजागृतीचे अनेक उपक्रम जिल्हाभरात राबविण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने रविवार
दि.२१रोजी सायंकाळी ५ वाजता मतदार जनजागृतीसाठी
सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवारी सायंकाळी
साडेचारवाजेपर्यंत सर्व सायकलपटूंनी जिल्हाधिकारी कार्यालयात जमावे, असे आवाहन स्वीप उपक्रमाच्या नोडल अधिकारी रेवती गायकर व
उपजिल्हा निवडणूक अधिकारी अपर्णा सोमाणी यांनी केले आहे.
Comments
Post a Comment