ठाणे शहरात वाहतुक मार्गात बदल
ठाणे शहरात वाहतुक मार्गात बदल
ठाणे दि.25(जिमाका): शहर वाहतुक
शाखेच्या ठाणे शाखेत शुक्रवार दि.26 रोजी ठाणे शहर भागात वाहतुक मार्गात बदल
करण्यात आला आहे.ठाणे मनपा मुख्यालया समोर
जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग नौपाडा
या ठिकाणी प्रचार सभा होणार आहे.या कालवधीत रहदारी सुरळीत रहावी म्हणून येथील
वाहतुक मार्गात बदल करण्यात आला आहे. तो याप्रमाणे जनरल अरुण कुमार वैद्य
मार्गावरील परमार्थ निकेतन कडुन ठाणे मनपा कडे जाणारे तसेच ठाणे मनपा सर्कल कडुन
परमार्थ निकेतन कडे ये-जा करणारे सर्व
प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.सदरची वाहने परमार्थ निकेतन कडुन रायगड गल्ली मार्गे सरोवर
दर्शन बिल्डींग कडुन अल्मेडा रोड ने त्यांचे इच्छित स्थळी जातील.त्याच प्रमाणे
टि.एम.सी . सर्कल कडुन परमार्थ निकेतन कडे जाणारी
सर्व वाहने अल्मेडा रोड ने, अथवा निपुण हॉस्पीटल समोरील संत ज्ञानेश्वर रोड
कडुन परमार्थ निकेतन मार्गे त्यांचे इच्छित स्थळी जातील. सदरचे बदल शुक्रवार दि.26 रोजी सकाळी 8 ते सभा
संपेपर्यंन्त लागु असुन या अधिसुचनेतुन
पोलिसांची वाहने,फायर ब्रिग्रेड,रुग्णवाहिका व अन्य अत्यावश्यक सेवांना वगळण्यात
आले आहे,असे पोलीस उप आयुक्त अमित काळे यांनी कळवले आहे.
Comments
Post a Comment