कौशल्य सेतू अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना लाभ देण्यासाठी 10 जूनपर्यंत मुदत
ठाणे दि. 31 (जिमाका)-
माध्यमिक शाळा अभ्यासक्रमात सन 2018-19 या शैक्षणिक वर्षा पुर्वी कौशल्य सेतू
अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना
मार्च 2019 च्या इयत्ता 10 वी च्या परिक्षेसाठी ‘ ट्रान्स्फर ऑफ क्रेडिट्स’
चा लाभ देण्यासाठी 10 जून पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. हा लाभ देण्यासाठी 10 जून पर्यंत अर्ज मागवून ते संबंधित विभागीय मंडळात संबंधित
विद्यालयाच्या प्रमुखांनी सादर करावयाचे
आहेत, असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे.
Comments
Post a Comment