मतमोजणी केंद्र परिसरात मनाई आदेश
ठाणे, दि.20(जिमाका)- लोकसभा निवडणूक 2019 च्या अनुषंगाने येत्या गुरुवारी दि.23 रोजी जिल्ह्यात
मतमोजणी होणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील मतमोजणी केंद्र परिसराच्या 100 मिटर परिसरात
कलम 144 (1) अन्वये मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत. सदरचे मनाई आदेश जिल्हादंडाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जारी केले आहेत. हे आदेश
नियुक्त निवडणूक निर्णय अधिकारी, कर्मचारी, निरीक्षक. मतमोजणी अधिकारी,
कर्मचारी उमेदवारांचे निवडणूक प्रतिनिधी,
मतमोजणी प्रतिनिधी इ. ना हे आदेश लागू असणार नाहीत, असेही जिल्हादंडाधिकारी राजेश
नार्वेकर यांनी कळविले आहे. सदरचे आदेश हे दि. 24 रोजी मध्यरात्री पर्यंत लागू
असतील.
00000
Comments
Post a Comment