अनुसूचित जमातीच्या मुला /मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती



ठाणे, दि.20(जिमाका)- महाराष्ट्र  शासनाचे आदिवासी विकास विभागाकडून राज्यातील अनुसूचित जमातींच्या १० विद्यार्थ्यांना परदेशात पदवी / पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यासाठी  शिष्यवृत्ती देण्यात येते. त्यात एम. बी. ए.   पदव्युत्तर - २  ,    वै द्यकीय अभ्यासक्रमासाठी पदवी करीता-१/ पदव्युत्तर-  , बी.टेक (इंजिनिअरिंग) पदवी करता- १/पदव्युत्तर-१ , विज्ञान शाखेसाठी पदव्युत्तर- १, तसेच कृषी शाखेतील पदव्युत्तर- २ , इतर विषयाचे अभ्यासक्रमातील पदव्युत्तर-२ अशा एकूण दहा आदिवासी विद्यार्थ्यांना  शिष्यवृत्ती देण्यात येते. या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी निकष खालील प्रमाणे-
विद्यार्थ्याचे वय 35 वर्षांपेक्षा जास्त नसावे,  नोकरीत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही वयोमर्यादा 40 वर्षांपर्यंत असेल. परदेशातील मान्यताप्राप्त विद्यापीठात विद्यार्थ्याला प्रथम वर्षाकरीता प्रवेश मिळालेला असावा. विद्यार्थ्याच्या कुटूंबाची कमाल आर्थिक मर्यादा सहा लाख रुपये वार्षिक इतकी आहे.
या शिष्यवृत्तीसाठी पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना जास्त प्राधान्य देण्यात येईल.पदव्युत्तर उमेदवार उपलब्ध न झाल्यास पदवीच्या  विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल.  दहापेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे अर्ज झाले तर अशा  विद्यार्थ्यांना त्यांनी इयत्ता १२ वी व पदवी अभ्यासक्रमात मिळवलेल्या गुणांच्याआधारे प्राधान्य देण्यात येईल. अधिक माहितीसाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प शहापूर यांच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा असे आवाहन  एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी, शहापूर जि. ठाणे यांनी केले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

जिल्ह्यातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घ्यावी

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांची शहापूर तालुक्यातील शेणवा प्राथमिक आरोग्य केंद्रास “सरप्राईज व्हिजिट”

विशेष लेख क्र.33 - जिल्हाधिकारी अशोक शिनगारे: लोकसेवेचा दीपस्तंभ