जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी घेतली दहशतवाद व हिंसाचार विरोधी शपथ
ठाणे, दि.21 (जिमाका)- येथील जिल्हाधिकारी कार्यालयात दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनाच्या निमित्ताने
अधिकारी कर्मचाऱ्यांनी सामुहिकपणे दहशतवाद व हिंसाचार विरोधी शपथ घेतली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम घेण्यात
आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवाजी पाटील यांनी सर्व उपस्थितांना शपथ
वाचून दाखविली व साऱ्यांनी ती सामुहिकपणे घेतली. या वेळी जिल्हाधिकारी
कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment