डोंबिवली(पूर्व) वाहतुक मार्गात बदल
ठाणे, दि.22 (जिमाका)- लोकसभा निवडणूक 2019 च्या अनुषंगाने 24- कल्याण या लोकसभा
मतदारसंघाची मतमोजनी ही गुरुवार दि.23
रोजी डोंबिवली पूर्व येथील ह.भ. प.
सावळाराम क्रीडा संकूल येथे होणार आहे. त्याअनुषंगाने या परिसरात होणारी वाहतुक कोंडी टाळण्यासाठी
खालील उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
या भागातील बंदीश हॉटेल ते घरडा
सर्कलकडे येणाऱ्या रोडवर व घरडा सर्कल ते बंदीश पॅलेस हॉटेलकडे जाणाऱ्या रोडवर
सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. या मार्गावरील सर्व
वाहतुक डोंबिवलीकडून घरडा सर्कल मार्गे
बंदीश पॅलेस हॉटेलकडे जाणारी वाहने सरळ घरडा सर्कल येथून रिजेन्सी – सुयोग हॉटेल
येथून इच्छित स्थळी जातील. त्यसेच बंदीश पॅलेस हॉटेलकडून घरडा सर्कलकडे जाणारी वाहने
सावित्रीबाई फ्गुले नाट्यगृह भारत गॅस गोडावून , पेंढारकर कॉलेज ते घरडा
सर्कल मार्गे इच्छित स्थळी जातील. सदरचे बदल ठाणे पोलीस आयुक्तालयाचे वाहतुक
विभागाचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी
एका अधिसुचनेद्वारे केले आहेत. ही अधिसुचना मतमोजणी संपेपर्यंत अंमलात
राहील. तसेच ही अधिसुचना पोलीस वाह्ने, अग्निशमन वाहने, रुग्णवाहिका आदी
अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू असणार नाही, असेही कळविण्यात आले आहे.
00000
Comments
Post a Comment