जिल्ह्यात अतिसार नियंत्रण पंधरवाड्यानिमित्त जनजागृती ओआरएस पाकीटे व झिंक टॅबलेटचे वाटप करणार
जिल्ह्यात अतिसार नियंत्रण पंधरवाड्यानिमित्त जनजागृती
ओआरएस पाकीटे व झिंक टॅबलेटचे वाटप करणार
ठाणे, दि.24 (जिमाका)- जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांमार्फत मंगळवार दि.28 ते रविवार दि.9 जून या कालावधीत अतिसार नियंत्रण पंधरवाडा राबविण्यात येणार
आहे. या कालावधीत आरोग्य यंत्रणांमार्फत घरोघरी जाऊन अतिसाराबाबत जनजागृती व
कारणे- उपचारांबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. अतिसारामुळे होणारे बालमृत्यू
शून्य करणे हे उद्दिष्ट समोर ठेवून या वर्षी राज्यात हा पंधरवाडा राबविण्यात येणार
आहे.
अतिसार नियंत्रण व उपचारासाठी जिल्ह्यात 15 लक्ष 18 हजार 720 ओआरएसची पाकीटे
व 1 कोटी 5 लाख 55 हजार 922 झिंक टॅबलेट्स
प्राप्त झाल्या आहेत, अशी माहिती आरोग्य यंत्रणांनी दिली.
या उपक्रमात अतिसाराबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच अतिसाराचे कारणे व उपचार याबाबतही
मार्गदर्शन केले जाणार आहे. वैयक्तिक
स्वच्छतेचे महत्त्व, ओआरएस द्रावण तयार
करण्याचे प्रशिक्षण, हात धुण्याचे प्रशिक्षण शाळा व अंगणवाडीतील मुलांना देण्यात
येणार आहे. तसेच शून्य ते पाच वर्षे या वयोगटातील अतिसार झालेल्या बालकांना आरोग्य विभागासाठी मोफत ओआरएसची पाकीटे व झिंक गोळी उपलब्ध करुन
देण्यात येणार आहे. या उपक्रमात
जिल्ह्यातील सर्व तालुके, सर्व महानगरपालिका, नगरपालिका सहभागी होणार आहेत.
Comments
Post a Comment