स्वाधार योजनेसाठी इच्छुक संस्थाकडून प्रस्ताव मागविले


स्वाधार योजनेसाठी इच्छुक संस्थाकडून प्रस्ताव मागविले
ठाणे दि. 30(जिमाका): महाराष्ट्र शासनामार्फत संकटग्रस्त पिडित महिलांना आधार देण्यासाठी व त्यांच्या पुनर्वसनासाठी केंद्र शासन पुरस्कृत स्वाधारगृह योजना राज्यात कार्यान्वीत करण्यात आली आहे.त्या अनुषंगाने महिला व बाल विकास क्षेत्रात कार्य करणाऱ्या सर्व स्वयंसेवी संस्थांनी विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह आपले प्रस्ताव संबधित जिल्हयाच्या जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांचेकडे दि.6 जून  पर्यंत सादर करावेत,असे आवाहन जिल्हा महिला बाल विकास अधिकारी,ठाणे यांनी केले आहे.
स्वाधार योजनेकरीता अटी व शर्ती:-
1.संस्था नोंदणी अधिनियम 1860 अंतर्गत नोंदणीकृत असावी
2.संस्थेस महिला व बाल विकास क्षेत्रातील किमान 5 वर्षे कामाचा अनुभव असावा.
3.संस्थेची अर्थिक परिस्थिती चांगली असावी
4.संस्थेच्या नावे किमान 15 लक्ष इतकी रक्क्म बॅकेत मुदत ठेव म्हणून असणे आवश्यक आहे.
5.योजना राबविण्याकरीता इच्छूक संस्था त्याच जिल्हयातील असावी.
6.संस्था निती आयोगाच्या पोर्टलवर नोंदणीकृत असावी.निती आयोगाच्या दर्पण पोर्टलवर नोंदणी नसल्यास संस्थेचे अर्ज ग्राहय धरण्यात येणार नाहीत.
7.संस्थेकडे योजनेच्या निकषानुसार कर्मचारी वर्ग असावा
8.योजना राबविण्याचे निकष दिनांक 23.03.2018 मधील शासन निर्णयानुसार असतील
9.प्रत्येक स्वाधारगृहाची क्षमता 30 लाभार्थ्यांकरीता राहील परंतु मोठया शहरांमध्ये ती 50 किंवा 100 पर्यत वाढविता येईल.याबाबतचा अंतिम  निर्णय राज्य शासनाचा राहील.
10.स्वाधार योजनेच्या प्रस्तावासोबत दयावयाच्या कागदपत्रांसाठी (प्रपत्र अ ) आपल्या जिल्हयातील जिल्हा बाल महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयास दि.6 जून पुर्वी संपर्क साधुन परिपूर्ण प्रस्ताव दि.6, जून पर्यंत जिल्हा कार्यालयास सादर करावा.सुधारीत स्वाधार योजनेचा दिनांक 23.3.2018 चा शासन निर्णय शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे,असे जिल्हा महिला बाल विकास अधिकारी ठाणे यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या 39 व्या वर्धापनदिन सोहळ्याचे आयोजन

जिल्ह्यातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घ्यावी

मोघरपाडा कारशेड डेपो मेट्रो मार्गिका 4.4अ, 10 व 11 संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न