अल्पसंख्याक विकास विभागाच्या योजनांच्या लाभासाठी प्रस्ताव मागविले



ठाणे, दि.21 (जिमाका)- शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाच्या विविध योजनांच्या लाभासाठी पात्र संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. राज्यातील धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासनमान्य शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अपंग शाळांमध्ये  अल्पसंख्याक विकास विभागाच्या माध्यमातून  पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी  राबविण्यात येणाऱ्या अनुदान योजनांअंतर्गत सन 2019-20 या वर्षाकरीता अनुदानासाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. तसेच डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेअंतर्गतही पात्र मदरशांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. हे प्रस्ताव संबंधित संस्थांनी 31 ऑगस्ट 2019 पर्यंत जिल्हा नियोजन समिती कार्यालय, तिसरा मजला, नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, ठाणे येथे सादर करावे, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी अमोल खंडारे यांनी केले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

भुवनेश्वर येथे पार पडलेल्या ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये ठाण्याच्या साईशा पवारने हर्डल्स शर्यतीत पटकाविले 'रजत पदक'

महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कारांवर कोकण व मुंबई प्राधिकरण विभागाची मोहोर

सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी नूतन ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय बांधकाम स्थळाला दिली भेट