स्कूल बस, व्हॅन योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण
ठाणे, दि.22 (जिमाका)- योग्यता प्रमाणपत्राची मुदत संपलेल्या सर्व स्कूल बसेस व
व्हॅन्स यांच्या योग्यता प्रमाणपत्राच्या नुतनीकरणासाठी स्कूल बसेस तपासणीसाठी
आणाव्यात असे आवाहन, प्रादेशिक परिवहन कार्यालय, ठाणे यांनी केले आहे. महाराष्ट्र
स्कूल बसेस करीता विनियम, नियम 2011 मधील नियम 10 मधील तरतूदीनुसार योग्यता
प्रमाणपत्राचे नुतनीकरण आवश्यक असते. शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुक
सुरक्षेसाठी हे आवश्यक आहे. तरी सर्व
स्कूल बस वाहन चालक, मालक तसेच शालेय व्यवस्थापन
यांनी प्रादेशिक परिवहन कार्यालय, ठाणे येथे संपर्क साधून वाहन योग्यता
प्रमाणपत्र नुतनीकरण करुन घ्यावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र
पाटील यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment