31 जुलै पुर्वी सहकारी संस्थांचे लेखापरिक्षण पुर्ण करण्याचे आवाहन
31 जुलै पुर्वी सहकारी संस्थांचे
लेखापरिक्षण पुर्ण करण्याचे आवाहन
ठाणे,दि.21(जिमाका) :-ठाणे
जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्थांना आवाहन करण्यात येते की,सहकार कायद्यातील
तरतुदीनुसार सर्व सहकारी संस्थांनी त्यांचे सन 2018-2019 चे वैधानिक लेखापरिक्षण
दि.31 जुलै पर्यंत पुर्ण होणे आवश्यक आहे.ज्या सहकारी संस्था त्याचे सन 2018-2019
वे वैधानिक लेखापरिक्षण विहित मुदतीत पुर्ण करुन घेणार नाहीत अशा सहकारी संस्थांवर
अशा सहकारी संस्थांवर निबंधकाकडून उचित कायदेशिर कारवाई करण्यात येईल.तसेच जे
लेखापरिक्षक सहकारी संस्थांचे लेखापरिक्षण विहित मुदतीत पुर्ण करण्यास जाणून बुजून
टाळाटाळ,कुचराई करतील अशा लेखापरिक्षकांवर सहकार कायदयातील तरतुदीनुसार कारवाई
करण्यात येईल.असे आवाहन जिल्हा विशेष लेखापरिक्षक वर्ग-1,सहकारी संस्था सदानंद
वुईके यांनी केले आहे.
Comments
Post a Comment