अनुसुचित जाती प्रवर्गातील लाभार्थींसाठी मोफत उद्योजकता परिचय मेळावा


अनुसुचित जाती प्रवर्गातील लाभार्थींसाठी मोफत उद्योजकता परिचय मेळावा
ठाणे,दि.21(जिमाका) :भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था(बार्टी ) पुणे द्वारा पुरस्कृत  व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र ठाणे द्वारा कल्याण येथे दि.शुक्रवार २८ जून  ते शनिवार दि.२७ जुलै दरम्यान एक महिना   कालावधीचा अनुसुचित जाती प्रवर्गातील युवक युवतीसाठी  मोफत उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे.
   सदर कार्यक्रमा अंतर्गत उद्योजकीय व्यक्तिमत्त्व विकास , सिध्दी प्रेरणा प्रशिक्षण कार्यक्रम , उद्योग  संधी शोध व मार्गदर्शन , उद्योगाविषयी शासनाच्या योजनांची माहिती ,बाजारपेठ सर्वेक्षण , प्रकल्प अहवाल, विक्री कौशल्य , डिजिटल मार्केटिंग , आयात निर्यात व्यापार , कामगार कायदे ,दुकान कायदे , विविध शासकीय परवाने , करप्रणाली, जीएसटी , इ.   विषयांवर  तज्ञानाकडून माहिती दिली जाणार आहे व प्रत्यक्ष  उद्योग भेटीचे आयोजन करण्यात आले आहे.कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी लाभार्थी अनुसुचित जाती प्रवर्गातील , किमान ८वी पास , वय १८ ते  ४५ वर्ष असावेत अशा अटी आहेत. कार्यक्रमास प्रवेशासाठी आधार कार्ड , अनुसुचित जातीचा दाखला , शैक्षणिक दाखला , दोन फोटो , इ. कागदपत्र  आवश्यक आहेत.
      सदर कार्यक्रमात फक्त ३० लाभार्थींची मुलाखती द्वारा  बुधवार दि.२६ जून  रोजी करण्यात येणार असून सर्व प्रशिक्षण कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी मंगळवार दि.२५ जुन  रोजी दुपारी १२ वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह , महानगरपालिका कार्यालय , डोंबिवली रेल्वे स्टेशनजवळ , डोंबिवली पुर्व जि.ठाणे येथे मोफत मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला आहे. प्रशिक्षण कार्यक्रमात लाभ घेऊ इच्छिणाऱ्याना मेळाव्यास उपस्थित राहणे अनिवार्य आहे. आधिक माहिती व प्रवेशासाठी प्रकल्प अधिकारी , महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र , द्वारा जिल्हा उद्योग केंद्र , ठाणे . मोबाईल नं. ७७२००७५९०१ व प्रकल्प अधिकारी समतादुत प्रकल्प  डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था  बार्टी  मोबाईल नं. ७९७७४१४६१२  येथे संपर्क साधावा.असे प्रकल्प अधिकारी 
महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र
 ठाणे यांनी कळविले आहे.


Comments

Popular posts from this blog

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या 39 व्या वर्धापनदिन सोहळ्याचे आयोजन

जिल्ह्यातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घ्यावी

मोघरपाडा कारशेड डेपो मेट्रो मार्गिका 4.4अ, 10 व 11 संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न