आर्थिक गणना घेण्यासाठी जिल्हास्तरीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण
आर्थिक
गणना घेण्यासाठी
जिल्हास्तरीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण
ठाणे,दि.13(जिमाका):केंद्र शासनातर्फे 2019 या वर्षात 7
वी आर्थिक गणना घेण्यात येणार आहे. या
गणनेमध्ये प्रथमच मोबाईल किंवा टॅबच्या माध्यमातून माहिती गोळा करण्यात येणार आहे.
जिल्हयात असलेल्या आस्थापनांची संख्या व त्यामधून निर्माण झालेला रोजगार या बाबतची
माहिती या गणनेच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.
7 वी आर्थिक गणना 2019 साठीचे ठाणे जिल्हयाचे जिल्हास्तरीय प्रशिक्षकांचे
प्रशिक्षण, नियोजन भवन, ठाणे येथे दिनांक 13जून रोजी सकाळी
10.00 ते सायंकाळी 5.00 या वेळेत संपन्न झाले.
सदर प्रशिक्षण कार्यक्रमास जिल्हाधिकारी
राजेश नार्वेकर (भा.प्र.से.) अध्यक्षस्थानी होते. त्यांच्यासह मुख्य कार्यकारी
अधिकारी, जिल्हा परिषद हिरालाल सोनावणे तसेच जिल्हा नियोजन अधिकारी, अमोल खंडारे, जिल्हा
सांख्यिकी अधिकारी, मनीषा माने व केंद्रीय राष्ट्रीय नमुना पाहणी संघटनेचे
अधिकारी, सी. एस. सी. संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक
तथा समन्वयक तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यांनी 7 व्या आर्थिक
गणनेची सर्व रुपरेषा मांडून त्याची उपयुक्तता स्पष्ट केली. आर्थिक गणनेची
माहिती अधिकाधिक अचूक पध्दतीने गोळा करण्याबाबत उपस्थितांना संबोधित केले. आर्थिक गणना
देशाच्या विकासासाठी किती महत्त्वाची आहे हे नमूद करुन सर्व जनतेने माहिती प्राप्त करुन
घेणा-या अन्वेषकांना सहकार्य करावे
असे आवाहन त्यांनी केले.
उपक्रम चांगला आहे आणि त्या कार्यासाठी आम्ही कार्य करण्यासाठी उत्सुक आहोत पण जी ऑनलाईन घेतली जाणारी परिक्षा आहे तो प्रकार खुप किचकट आहे. तो बंद करून दुसरा काही तरी मार्ग शोधावा. (९७०२०६८२६३)
ReplyDelete