गोवर्धन गोवंश सेवा केंद्रांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

गोवर्धन गोवंश सेवा केंद्रांसाठी अर्ज करण्याचे आवाहन
ठाणे दि.25 (जिमाका): ठाणे जिल्ह्यात पुर्वीची गोवर्धन गोवंश सेवा केंद्र ही योजना रद्द करुन सुधारीत गोवर्धन गोवंश सेवा 2019-20 या अर्थिक वर्षात राबविण्यास शासन मान्यता प्राप्त झाली आहे.या सेवेसाठी इच्छूक संस्थानी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.संस्था धर्मदायुक्तांकडे नोंदणीकृत असावी.गोवंश संगोपनाचा कमीत कमी 03 वर्षाचा अनुभव असावा.पशुधन संगोपनासाठी व वैरण उत्पादनासाठी संस्थेकडे स्वत:च्या मालकीची अथवा वर्षाच्या भाडेपट्टीवरची किमान 5 एकर जमीन आसावी.संस्थेच्या नजीकच्या मागील 3 वर्षाचे लेख परिक्षण झालेले असणे आवश्यक आहे.एकूण अनुदानाच्या 30 टक्के खेळते भांडवल संस्थेकडे असावे.गोपालन करण्यासाठी खात्याशी करारनामा तसेच राष्ट्रीयकृत बॅकेत खाते असणे आवश्यक आहे.
योजनेत केवळ मुलभूत सुविधा निमार्ण करण्याकरिता एकूण 25.00 लक्ष अनुदान देय राहिल.अनुदानासाठी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त,ठाणे यांच्याकडे अर्ज व इतर अनुषंगीक माहिती सादर करण्याची अंतिम तारीख 30 जून राहिल.इच्छूक व पात्र संस्थेने अर्ज करावेत अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन व पशुधन विकास अधिकारी(विस्तार)पं.स. यांच्याकडे संपर्क साधावा असे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त,ठाणे(मु.मुलूंड) यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या 39 व्या वर्धापनदिन सोहळ्याचे आयोजन

जिल्ह्यातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घ्यावी

मोघरपाडा कारशेड डेपो मेट्रो मार्गिका 4.4अ, 10 व 11 संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न