इतर मागासवर्ग प्रवर्गातील व्यक्तींना अल्प व्याज दरात अर्थसहाय्य
इतर मागासवर्ग प्रवर्गातील व्यक्तींना अल्प व्याज दरात अर्थसहाय्य
ठाणे दि.29 (जिमाका):शामराव पेजे कोकण
इतर मागासवर्ग अर्थिक विकास महामंडळ लि.यांच्याकडून मागासवर्ग प्रवर्गातील पात्र
व्यक्तींना अल्प व्याज दराने स्वयंरोजगाराकरिता अर्थसहाय्य उपलब्ध करुन देत आहे. ठाणे
जिल्हामधील गरजू व होतकरु पात्र व्यक्तींना सदरच्या कर्ज योजनेंचा लाभ घेण्याचे आवाहन
करण्यात आले आहे.
कर्ज
योजनाची माहिती
20 टक्के बीज भांडवल योजना : इतर मागासवर्ग प्रवर्गातील पात्र व्यक्तींना
स्वंय रोजगारासाठी राष्ट्रीयकृत बॅका,ग्रामीण बॅक व अग्रणी बॅकेने पुरस्कृत
केलेल्या बॅकाच्या माध्यामातून कर्ज उपलब्ध करुन देते.सदरच्या योजनेत बॅकेचा सहभाग
75 टक्के,राज्य महामंडळाचा सहभाग 20 टक्के व लाभार्थीचा सहभाग 5 टक्के आहे.व्याजाचा
दर महामंडळाच्या कर्जावर दसादसे 6 टक्के रक्कमेवर बॅकेच्या व्याज दराने कर्ज
उपलब्ध करुन देण्यात येते.कर्जाची परतफेड हि 5 वर्षामध्ये करावयाची आहे.सदरच्या
कर्ज योजनेसाठी पात्र व्यक्ती हि इतर मागासवर्ग प्रवर्गातील असावी व त्याच्या
एकत्रित कुटूबांचे वार्षिक उत्पन्न हे रु 1 लक्ष पर्यंत असावे.
थेट कर्ज योजना : इतर मागासवर्गीय घटकातील व्यक्तींचा आर्थिक स्थर उंचविण्यासाठी
महामंडळाकडून रु 1 लक्ष पर्यंतचे लघू व किरकोळ व्यवसायासाठी कर्ज तात्काळ उपलब्ध
करुन देण्यात येते.या कर्ज योजनेंतर्गत नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या लाभार्थींना
व्याज आकारण्यात येणार नाही.सदरच्या कर्जाची वसुली 48 समान हप्तामध्ये असेल.अर्जदार
इतर मागासवर्ग प्रवर्गातील असावा व त्याचे वय 18 ते 55 वर्षे इतके
असावे.अर्जदाराचे एकत्रित कौटूबिक वार्षिक उत्पन्न रु 1 लाखापेक्षा जास्त नसावे.अधिक
माहितीसाठी जिल्हा व्यवस्थापक,शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग अर्थिक विकास
महामंडळ लि . एमएमआरडीए पूनर्वसन बिल्डीग नं.ए-1/7 सिध्दार्थ नगर,चिंधी बाजाराजवळ
कोपरी,ठाणे(पू)400603.भ्रमणध्वनी 9004350289 संपर्क करावा.
Comments
Post a Comment