कांदळवन संदर्भात तक्रारींचे तात्काळ निराकरण करा-जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर
कांदळवन संदर्भात तक्रारींचे तात्काळ
निराकरण करा-जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर
ठाणे,दि.26(जिमाका):- कांदळवनासंदर्भात पर्यावरण प्रेमी नागरीक, तसेच संबधित संस्थांकडून होणाऱ्या तक्रारी व तक्रारीचे निराकरण लवकरात लवकर करण्यात
यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर
यांनी आज येथे दिले.कांदळवनाचे क्षेत्र संरक्षण व संवर्धनासंदर्भात समिती सभागृहामध्ये जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या
अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील,सहाय्यक संचालक नगर रचनाचे प्रकाश रविराव ,सहाय्यक उप वनसंरक्षक श्रीम.गिरीजा देसाई, उप आयुक्त मिरा भाईंदर म.न.पा. दिपक पुजारी,नायब तहसिलदार व्ही .पवार.व कांदळवन क्षेत्राशी
निगडीत असणारे जिल्हातील अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत नागरिकांच्या तक्रारी संदर्भात चर्चा करण्यातआली.
कांदळवन संरक्षण व संवर्धनाच्या अनुषंगाने सर्व शासकीय यंत्रणा, अधिकारी, यांना पुढील बैठकीत नागरीकाच्या तक्रारी
संदर्भात सर्व माहिती सादर करावी असे निर्देश देण्यात आले. संवेदनशील कांदळवन क्षेत्रात
वाहनांना प्रवेशबंदी बाबत उपाययोजना करणे, आवश्यकतेनुसार सीसीटिव्ही बसविणे, कांदळवन क्षेत्रात अतिक्रमण करणाऱ्यावर कायदेशिर कारवाई करण्याबाबतही जिल्हाधिकाऱ्यांनी
यंत्रणांना निर्देश दिले.
Comments
Post a Comment