तलाठी भरती परिक्षार्थीना सुचना


तलाठी भरती परिक्षार्थीना  सुचना
ठाणे दि.29 (जिमाका): महसुल विभागाच्या आखत्यारित असलेल्या तलाठी संवर्गातील रिक्त पदे भरण्याची कार्यवाही महा-आयटीच्या माध्यमातून करण्यात येत आहे. 2 जुलै ते 26 जुलै या कालावधीत सकाळी 10 ते 12 व दुपारी 2.30 ते  4.30  या वेळेत तळाठी परिक्षा घेण्यात येणार आहे.सदर परिक्षेचे पुर्ण संचलन व कार्यान्वयन महा.आयटी (माहिती तंत्रज्ञान) विभाच्या माध्यमातुन ई-महापरिक्षा मार्फत घेण्यात येत आहे.उमेदवारांच्या पसंतीच्या जिल्हायात परिक्षा देण्यासाठी संगणक विषयक पायाभूत सोयी असणाऱ्या शाळा,कॉलेजची निवड महा-आयटीकडून करण्यात आली आहे.122 परिक्षा केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. परिक्षा केंद्रावर उपस्थित राहताना उमेदवाराने पॅन कार्ड,पासपोर्ट,वाहन चालवण्याचा परवाना,मतदान ओळखपत्र,मुळ फोटोसह राष्ट्रीयकृत बॅक पासबुक,आधार कार्ड,या पैकी एक पुरवा आपल्या जवळ ठेवावा. रंगित झेरॉक्स चालणार नाही.अशा स्पष्ट सुचना उमेदवारांच्या  हॉल तिकीटवर देण्यात आल्या आहेत.महापरिक्षा पोर्टलवरील तसेच हॉल तिकीटवरील सुचनाचे उमेदवारांनी तंतोतेत पालन करणे आवश्यक आहे.या संदर्भात अधिक माहिती व तक्रार नोंदविण्यासाठी महापरिक्षाचा टोल फ्री क्रमांक 180030007766 व enquiry@mahapariksah.gov.in या मेलवर संपर्क साधावा असे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या 39 व्या वर्धापनदिन सोहळ्याचे आयोजन

जिल्ह्यातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घ्यावी

मोघरपाडा कारशेड डेपो मेट्रो मार्गिका 4.4अ, 10 व 11 संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न