मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या 39 व्या वर्धापनदिन सोहळ्याचे आयोजन
ठाणे,दि.06(जिमाका):- दि.07 फेब्रुवारी 1986 रोजी स्थापन झालेल्या महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचा 39 वा वर्धापन दिन सोहळा दि.07 फेब्रुवारी 2025 रोजी बांद्रा येथील महासंघ कल्याणकेंद्र येथे संपन्न होणार आहे.
हा सोहळा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत तर मुख्य सचिव सुजाता सौनिक, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर व सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता राजेंद्र रहाणे यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
या निमित्ताने, वर्ष 2024-25 मध्ये कल्याणकेंद्र निधी संकलन व संघटनात्मक उल्लेखनीय कार्य केलेल्या ठाणे, अमरावती, कोल्हापूर, नागपूर, नांदेड, मुंबई उपनगर, पुणे या जिल्हा समन्वय समितींना “आदर्श जिल्हा समन्वय समिती” पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या वतीने उल्लेखनीय कार्याबद्दल कोकण विभागीय सहसरचिटणीस तथा वैद्यकीय अधिकारी डॉ.अविनाश भागवत, ठाणे जिल्हा कार्यकारिणीचे अध्यक्ष तथा निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने, ठाणे जिल्हा समन्वय समितीचे सरचिटणीस तथा जिल्हा माहिती अधिकारी मनोज सुमन शिवाजी सानप, निवासी उपजिल्हाधिकारी सतीश बागल, वस्तू व सेवा कर, बांद्रे, मुंबईच्या उपआयुक्त श्रीमती सुलभा भिलारे सणस, मुख्य अभियंता, सा.बां.वि., पुणे इंजि. अतुल चव्हाण, राज्य उत्पादन शुल्क, मुंबई सहआयुक्त, सुनिल चव्हाण, मंत्रालय, मुंबई अवर सचिव, अशोक चेमटे, सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख, राज्य परिवहन महामंडळाचे संचालक (वित्त) गिरीश देशमुख, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, बांद्रा, मुंबईचे सचिव संदिप देशमुख, अर्थ व सांख्यिकी, बांद्रा, मुंबईचे मुख्य संशोधन अधिकारी नवेंदु फिरके, आयुक्त कार्यालय, नागपूरचे उपायुक्त, डॉ. कमलकिशोर फुटाणे, गडचिरोलीच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती प्रिती हिरळकर, पशुसंवर्धन, कारंजा (लाड), वाशिम सहाय्यक आयुक्त डॉ.संदिप इंगळे, शासकीय दंत महाविद्यालय, मुंबईचे सहयोगी प्राध्यापक डॉ.सोनाली कदम, भूमी अभिलेख, अमरावतीचे उपसंचालक डॉ.लालसिंग मिसाळ, मंत्रालयाचे अवर सचिव संतोष ममदापुरे, नागपूर जलसंपदा विभागाचे शाखा अभियंता इंजि. योगेश्वर निंबुळकर, कक्ष अधिकारी (16-अ), सा.प्र.वि., मंत्रालय श्रीमती पल्लवी पालांडे, सा.बां.वि., कोल्हापूरचे शाखा अभियंता इंजि.पूनम पाटील, वैद्यकीय अधिकारी, नांदेड डॉ. राजेंद्र पवार, लातूर जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता, इंजि. बाळासाहेब शेलार, कोल्हापूरचे अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांना “उत्तम कार्यकर्ता” पुरस्कार तसेच कार्यालय सचिव रजनीश कांबळे यांना पत्रकारिता पदवी संपादन केल्याबद्दल “विशेष पुरस्कार” प्रदान करून गोरविण्यात येणार आहे.
अधिकारी महासंघाच्या आग्रही मागणी, अभ्यासपूर्ण मांडणी व सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे, अनेक प्रलंबित प्रश्नांसंबंधी शासनाचे स्वागतार्ह निर्णय झाले आहेत. वर्धापनदिन सोहळ्यात अधिकाऱ्यांचे उर्वरित प्रलंबित प्रश्न मान्यवरांच्या निदर्शनास आणून त्यावर अभ्यासपूर्ण चर्चादेखील होणार आहे.
तरी या पुरस्कार सोहळ्यास राजपत्रित वर्ग 1 व 2 अधिकाऱ्यांनी महासंघ कल्याणकेंद्र, स.नं.341, गुरुनानक हॉस्पीटलजवळ, न्यायसागर सोसायटीच्या बाजूला, बांद्रा (पूर्व) येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे मुख्य सल्लागार तथा संस्थापक ग.दि.कुलथे, अध्यक्ष विनोद देसाई, कोषाध्यक्ष नितीन काळे, सरचिटणीस समीर भाटकर आणि दुर्गा महिला मंचाच्या अध्यक्षा सिद्धी संकपाळ यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment