अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश न घेण्याचे आवाहन


अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश न घेण्याचे आवाहन
ठाणे,दि.21(जिमाका) :-जिल्ह्यात काही ठिकाणी शासनाच्या परवानगी शिवाय अनधिकृत शाळा सुरु करण्यात आल्या आहेत.  या संबंधित शाळा चालकांनी  सन 2019-20 या शैक्षणिक वर्षात  शासनाची परवानगी प्राप्त झाल्याशिवाय शाळा सुरु करु नये, तसेच पालकांनी अनधिकृतशाळांमध्ये आपल्या पाल्यांचा प्रवेश घेऊ नये असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ठाणे यांनी केले आहे.
 अशा अनधिकृत शाळा सुरु असल्याचे निदर्शनास आल्यास  संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ठाणे यांनी  शिक्षणाचा अधिकारी कायदा 2009 च्या व महाराष्ट्र शासन नियमावली 2011 च्या अनुसार कार्यवाही करावी, असे निर्देशही देण्यात आले आहेत.  तरी पालकांनी जागरुक राहून आपल्या पाल्यांचा प्रवेश अशा अनधिकृत विद्यालयात घेऊ नये. अनधिकृत शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा ही अन्य मान्यता प्राप्त प्राथमिक शाळांमधून घेतली जाणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास पालकच जबाबदार राहतील, याची पालकांनी नोंद द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
 जिल्ह्यातील अनधिकृत शाळांची यादी याप्रमाणे-
आदर्श विद्यालय लोढा(इंग्लिश) निळजे,कल्याण. आदर्श विद्यालय लोढा(हिंदी) निळजे,कल्याण. आदर्श विद्यालय लोढा(मराठी) निळजे,कल्याण.पोदार इंटरनॅशनल स्कूल(C I E)उंबर्डे के.डी.एम.सी.कल्याण डोंबिवली(इंग्रजी).प्रशिक स्पेशल स्कूल मिरा-भाईन्दर(मराठी).भारती जागरण इंग्लिश सेकंडरी विद्यालय,कोपरखैराणे,नवी मुंबई(इंग्रजी).साईज्योत सेकंडरी स्कूल कोपरखैराणे,नवी मुंबई.(इंग्रजी).अल मुमिनाह सेकंडरी स्कुल बेलापूर,नवी मुंबई(इंग्रजी).ज्ञानदिप सेवा सेंकंडरी इंग्लिश स्कूल करावे,नवी मुंबई.आरक्वॉम इस्लामिक स्कूल ठाणे(इंग्रजी).रफिक इंग्लिश हायस्कूल ,ठाणे(इंग्रजी).स्टार इंग्लिश हायस्कूल,ठाणे(इंग्रजी).आदर्श विद्यालय,सेकंडरी,हिंदी दिवा ठाणे.नालंदा हिंदी विद्यालय,ठाणे.होली मारिया कॉन्व्हेंट हायस्कूल,ठाणे(इंग्रजी).स्वामी समर्थ हायस्कूल,वसार,भाल,अंबरनाथ.(मराठी)नवभारत इंग्लिश हायस्कूल,अंबरनाथ.प्रगती विद्यामंदीर,चिखलोली अंबरनाथ(मराठी).आतमन ॲकॅडमी,ठाणे(इंग्रजी).अरुणज्योत विद्यालय,ठाणे(हिंदी).या शाळेत प्रवेश घेऊ नये असे कळविण्यात  आले आहे.

Comments

Popular posts from this blog

भुवनेश्वर येथे पार पडलेल्या ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये ठाण्याच्या साईशा पवारने हर्डल्स शर्यतीत पटकाविले 'रजत पदक'

महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कारांवर कोकण व मुंबई प्राधिकरण विभागाची मोहोर

सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी नूतन ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय बांधकाम स्थळाला दिली भेट