डी.एल.एड.प्रवेशासाठी मुदत वाढ
डी.एल.एड.प्रवेशासाठी मुदत वाढ
ठाणे,दि.26(जिमाका):-महाराष्ट्र
शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण) पुणे यांचेमार्फत शैक्षणिक वर्ष
2019-20 साठी प्राथमिक शिक्षण पदविका अभ्यासक्रम(D.EI.ED) प्रथम वर्ष ऑनलाईन(शासकीय कोटा) प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी
दिनांक 24 जून पर्यंत ठेवण्यात आली होती.सदर अर्ज भरण्याची रविवार दि. जून 30 रोजी
सायं.6 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.याबाबतच्या सर्व सुचना ,प्रवेश पात्रता
इत्यादी माहिती महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या
प्राधिकरण) च्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध
आहेत.ऑनलाईन अर्ज भरल्यांनंतरचे फेरीनिहाय सविस्तर वेळापत्रक संकेतस्थळावर उपलब्ध
असेल,यासाठी संबधितांनी वेळोवेळी संकेतस्थळ पहावे.असे प्राचार्य,जिल्हा शैक्षणिक सातत्यपुर्ण
व्यावसायिक विकास संस्था,रहाटोली जि .ठाणे यांनी कळवले आहे.
Comments
Post a Comment