मागासवर्गीय मुलांसाठी मोफत वसतिगृह


 मागासवर्गीय मुलांसाठी मोफत वसतिगृह
  ठाणे दि. 27(जिमाका):  डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे मोफत शासकीय वसतिगृह रिक्त जागेवर प्रवेश देण्यात येत आहे. त्यासाठी सुखसागर अपार्टमेन्ट 2 मजला,घुंघट नगर,कल्याण नाका,भिवंडी,जि,ठाणे. सन 2019-20 या शैक्षणिक वर्षासाठी ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया ही सुरु झाली आहे. ऑफलाईन अर्ज वसतिगृहात उपलब्ध आहेत. शासकीय सुट्टी वगळून कार्यालयीन वेळेत अर्ज वसतिगृहात मिळतील .
प्रवेशाचे निकष:-
विद्यार्थी हा शैक्षणिक वर्षाच्या नियमित अभ्यासक्रमातील प्रथम वर्षासाठी प्रवेशास पात्र असावा.शाळेय विभागासाठी इयत्ता 7 वी उत्तीर्ण व महाविद्यालयीन विभागासाठी इयत्ता 10 वी,12 वी,पदवी उत्तीर्ण असावा.
प्रवेशार्थी हा महाराष्ट्राचा रहिवाशी असावा.(Domacile असणे आवश्यक)
प्रवेशार्थी हा अनुसूचित जाती, विमुक्त जमाती, भटक्या जमाती, व इतर मागासवर्गीय, किंवा आथिर्कदृष्ट्या मागासलेल्या प्रवर्गातील असावा.
शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी प्रवेशार्थी यांचे सर्व मार्गाने मिळून वार्षिक उत्पन्न अनु. जमाती प्रवेशार्थीसाठी  रु. 2 लाखाचे आत व विमुक्त जाती, भटक्या जमाती, व इतर मागासवर्गीय, किंवा अर्थिक दृष्टया मागासलेल्या प्रवर्गातील प्रवेशार्थीसाठी रु. 1 लाखच्या आत असावा.
 शासकीय वसतिगृह प्रवेश अर्जासोबत तहसिलदार यांचे सहिचा सन 2019-20 मधील उत्पन्नाचा दाखला व पास झालेचे गुणपत्रक,बॅक पासबुकाच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत रेशकार्डची झेरॉक्स प्रत,आधार कार्ड झेरॉक्स, प्रत जोडणे आवश्यक आहे.
वसतिगृहात गुणवत्तेनुसारच प्रवेश देण्यात येईल.
अर्जात भरलेली माहिती चुकीची असल्यास अथवा आवश्यक कागदपत्रे नसल्यास प्रवेश फॉर्म रद्द करण्याचे अधिकारी वसतिगृहात गृहपाल यांना राहतील. याबाबत कोणत्याही तक्रारीची दखल घेतली जाणार नाही.
ऑफलाईन अर्ज भरण्याची मुदत शालेय विद्यार्थीसाठी 4 जुलै पर्यंत राहिल,11 वी 12 वी नंतरच्या अभ्यासक्रम प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यासाठी (व्यवसायिक अभ्यासक्रम वगळून) मुदत 20 ऑगस्ट पर्यंत राहिल.बी.ए.,बी.कॉम,बी.एस.सी. आशा 12 वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या पदवीका,पदवी,एम.ए,एम.कॉम,एम.एस.सी,असे पदवी नंतरचे पदव्युत्रतर,पदवी,पदवीका इत्यादी अभ्यासक्रम 24 ऑगस्ट पर्यंत मुदत राहिल.व्यावसायिक अभ्यासक्रम 15 जुलै ते 28 ऑगस्ट राहिल.
अधिक माहितीसाठी वसतिगृहाच्या पत्ता डॉ.बाबासाहेब आंबेडकर  मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह,सुखसागर अपार्टमेन्ट -2 वा मजला,घुंघट नगर,कल्याण नाका,भिवंडी,जि,ठाणे.पिनकोड -421302  येथे संपर्क साधावा. अधिकाधिक विद्यार्थांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

00000000


Comments

Popular posts from this blog

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या 39 व्या वर्धापनदिन सोहळ्याचे आयोजन

जिल्ह्यातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घ्यावी

मोघरपाडा कारशेड डेपो मेट्रो मार्गिका 4.4अ, 10 व 11 संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न