मागासवर्गीय-आर्थिकदृष्टया मागासवर्गीय मुलींसाठी मोफत वसतिगृह
मागासवर्गीय-आर्थिकदृष्टया मागासवर्गीय मुलींसाठी मोफत
वसतिगृह
ठाणे दि. 27(जिमाका): मागासवर्गीय तथा आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय
मुलींसाठी मोफत शासकीय वसतिगृह प्रवेश देण्यात येतो. त्यासाठी सुखसागर अपार्टमेन्ट
-5 वा माळा,घुंघट नगर,कल्याण नाका,भिवंडी,जि,ठाणे. सन 2019-20 या शैक्षणिक
वर्षासाठी ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया ही सुरु झाली आहे. ऑफलाईन अर्ज वसतिगृहात
उपलब्ध आहेत. शासकीय सुट्टी वगळून कार्यालयीन वेळेत अर्ज वसतिगृहात मिळतील .
प्रवेशाचे निकष:-
• अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जाती, विशेष मागास प्रवर्ग, आथिर्कदृष्ट्या
मागासप्रवर्ग,अपंग, अनाथ, दारिद्र रेषेखालील विद्यार्थिनी पात्र.
• पालकांची वार्षिक उत्पन्न मर्यादा अनु. जातीसाठी रु 2 लाख.
विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग यांच्यासाठी
रु. 1 लाख. (अपंग व अनाथ यांच्यासाठी उत्पन्नाची मर्यादा नाही.)
• अभ्यासक्रमाच्या शालेय विभाग इयत्ता 8 वी 9 वी, 10 वी व महाविद्यालयीन विभाग, पहिल्या वर्षाला प्रवेश
घेतलेले विद्यार्थी ऑफलाईन अर्ज भरु शकतील.
• अर्जात भरलेली माहिती चुकीची असल्यास आवश्यक कागदपत्रे
नसल्यास प्रवेश फॉर्म रद्द करण्याचे अधिकारी वसतिगृहात गृहपाल यांना राहतील.
याबाबत कोणत्याही तक्रारीची दखल घेतली जाणार नाही.
• ऑफलाईन अर्ज भरण्याची मुदत शालेय विद्यार्थीसाठी 1
जुलै पर्यंत राहिल,11 वी 12 वी नंतरच्या अभ्यासक्रम प्रवेश घेतलेल्या
विद्यार्थ्यासाठी (व्यवसायिक अभ्यासक्रम वगळून) मुदत 6 जुलै
राहिल.बी.ए.,बी.कॉम,बी.एस.सी. आशा 12 वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश
घेतलेल्या पदवीका,पदवी,एम.ए,एम.कॉम,एम.एस.सी,असे पदवी नंतरचे पदव्युत्रतर,पदवी,पदवीका
इत्यादी अभ्यासक्रम 20 जुलै पर्यंत मुदत राहिल.व्यावसायिक अभ्यासक्रम 15 जुलै ते
10 ऑगस्ट राहिल.
अधिक माहितीसाठी वसतिगृहाच्या पत्ता अधीक्षिका, मागासवर्गीय तथा आर्थिकदृष्ट्या
मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह,सुखसागर अपार्टमेन्ट -5 वा माळा,घुंघट
नगर,कल्याण नाका,भिवंडी,जि,ठाणे. दूरध्वनी क्र. 0251-258104 येथे संपर्क साधावा. अधिकाधिक
विद्यार्नीथिनींनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment