राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त सामाजिक न्याय दिन साजरा



राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त सामाजिक न्याय दिन साजरा
ठाणे,दि.26(जिमाका):-सामाजिक न्याय विभागाच्या वतीने दि.26 जून रोजी सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण,ठाणे व जिल्हा समाज कल्याण अधिकारी,जि.प.ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्ताने टाऊन हॉल,कोर्ट नाका,ठाणे येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .त्याच प्रमाणे जिल्हा समाज कल्याण अधिकारी,जि.प. ठाणे वतीने जि.प.शाळेतील विद्यार्थांनी समता दिंडीचे आयोजन केले होते.यावेळी एका सजविलेल्या रथात छत्रपती शाहु महाराज यांची प्रतिमा ठेवून मिरवणूक काढण्यात आली.
या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून श्री.रघुनाथ देशमुख यांनी शाहु महाराज यांच्या विषयी विद्यार्थांना मार्गदर्शन माहिती सादर केली.कार्यक्रमाचे प्रमुख श्रीम.सलीम र.तडवी(जिल्हा समाज कल्याण अधिकारी जि.प.ठाणे) यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण करुन विद्यार्थांना मार्गदर्शन केले.या कार्यक्रमात ठाणे जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व शिष्यवृत्तीचे धनादेश देऊन सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीम.देहाडे मॅडम व कार्यक्रमाचे नियोजन वि.रा.मुळम.सलेअ.समाज कल्याण,ठाणे व श्री.संतोष सोनावणे यांनी केले.या प्रसंगी विस्तार अधिकारी ङि जी ओंकारेश्वर,व चंद्रकांत पाटील,श्रीम.सरीता बेंडकोळी,सविता गोसावी,आर बी पवार,बी एस धनगर ,जे.डी.शेलार,उपस्थित होते. 

Comments

Popular posts from this blog

गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये

विशेष लेख क्र.33 - जिल्हाधिकारी अशोक शिनगारे: लोकसेवेचा दीपस्तंभ

“पत्रकारितेची पाठशाळा - बातमी मागची गोष्ट” कार्यशाळा ठाण्यात उत्साहात संपन्न