दिव्यांग पुरस्कारासाठी 10 ऑगस्ट पर्यंत अर्ज करावेत
दिव्यांग पुरस्कारासाठी 10 ऑगस्ट पर्यंत अर्ज करावेत
ठाणे, दि.28 (जिमाका):- केंद्र शासनाच्या विकलांगजन शक्तीकरण विभागाने सन 2019 पुरस्कारासाठी दिव्यांग व्यक्तीना
अर्ज 10 ऑगस्ट पर्यंत करण्याचे आवाहन केले आहे.
उत्कृष्ठ कर्मचारी, अधिकारी, दिव्यांगासाठी काम करणाऱ्या व्यक्ती, दिव्यांगाचे जीवनमान उंचावण्यासाठी
संशोधन, दिव्यांगाचे पुनर्वसन करणारा उत्कृष्ठ जिल्हा, उत्कृष्ठ काम करणाऱ्या प्रौढ दिव्यांग व्यक्ती, चांगले काम करणारे दिव्यांग बालक, उत्कृष्ठ ब्रेल छाप खाना, सहज साध्य संकेत स्थळ, क्रीडा क्षेत्रात चांगले काम करणाऱ्या दिव्यांग व्यक्ती यांनी पुरस्कारसाठी अर्ज
करावेत.
या अर्जामधूनच महाराष्ट्र राज्याच्या
सामाजिक न्याय विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या दिव्यांग कल्याण राज्य पुरस्कारासाठी निवड
करण्यात येईल. त्यासाठी अर्ज करावयाचा नमुना http://disablityffairs.gov.in
या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.
अर्जदाराने आपले अर्ज विहित नमुन्यात
इंग्रजीमध्ये व हिंदीमध्ये संक्षिप्त माहितीसह तीन प्रतीत आवश्यक त्या कागदपत्रासह
दि.10 ऑगस्ट पर्यंत जिल्हा समाज कल्याण
अधिकारी, जिल्हा परिषद, ठाणे या कार्यालयात सादर करावेत. अधिक माहितीसाठी दिव्यांग शाखा संपर्क क्र, 022-25448677 या नंबर वर संपर्क
करावा, असे जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, ठाणे यांनी कळविले आहे.
00000
Comments
Post a Comment