डी.एल.एड. प्रवेशासाठी इच्छुकांनी 2 ऑगस्ट पुर्वी अर्ज करावेत
डी.एल.एड. प्रवेशासाठी इच्छुकांनी
2 ऑगस्ट पुर्वी अर्ज करावेत
ठाणे, दि.28 (जिमाका) :- महाराष्ट्र
शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण) पुणे यांचेमार्फत शैक्षणिक वर्ष
2019-20 साठी प्राथमिक शिक्षण पदविका अभ्यासक्रम प्रथम वर्ष ऑनलाईन प्रवेशासाठी शुक्रवार
दि. 2 ऑगस्ट पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुकांनी ऑनलाईन अर्ज दाखल करावेत.
याबाबतच्या
सर्व सुचना, प्रवेश पात्रता इत्यादी माहिती महाराष्ट्र राज्य शैक्षणिक
संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण) च्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर
उपलब्ध आहेत. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतरचे फेरीनिहाय सविस्तर वेळापत्रक संकेतस्थळावर उपलब्ध
असेल, यासाठी संबधितांनी वेळोवेळी संकेतस्थळ पहावे, असे प्राचार्य, जिल्हा शैक्षणिक सातत्यपुर्ण व्यावसायिक विकास संस्था, रहाटोली जि .ठाणे यांनी कळवले.
Comments
Post a Comment