कारगिल विजयदिनी 30 सिंधी बांधवाना भारतीय नागरिकत्व



कारगिल विजयदिनी 30 सिंधी बांधवाना भारतीय नागरिकत्व
ठाणे, दि. 26 जिमाका : ठाणे जिल्ह्यात 20 वा कारगिल युध्द विजय दिन व माजी सैनिक संम्मेलन कार्यक्रमाचे नियोजन भवन येथे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आले. या वेळी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन शहिद  जवान स्मृती प्रतिमेस पुष्प अर्पण करण्यात आले. या कार्यक्रमास जिल्ह्यातील माजी सैनिक, माजी सैनिकाच्या विधवा, युध्द विधवा, माजी सैनिक संघटना यांना आमंत्रित करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून 30 सिंधी बांधवाना भारतीय नागरिकत्वाचे प्रमाणपत्र जिल्हाधिकारी व आमदार (राज्यमंत्री दर्जा) गुरुमुक जगवानी यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी ठाणे जिल्ह्यातील माजी सैनिकांच्या समस्या, अडचणी, तक्रारी यांचे निवारण करण्यात आले.
या प्रसंगी ठाण्यातील वीर पत्नी श्रीमती मीरा देवी, श्रीमती सत्याराणा, श्रीमती बेबी जोन्ह सी, श्रीमती सुप्रिया सुधीर आंब्रे यांना सन्मानित करण्यात आले व कारगिल युध्दात सहभागी झालेले माजी सैनिक संजय चौधरी, संजय पवार, कॅप्टन मिश्रा यांना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या वेळी कारगिल शहीद जवानांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
सदर कार्यक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील, पोलिस अधिक्षक संजय पाटील, जिल्हा सैनिक अधिकारी मेजर प्रांजळ जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
00000



Comments

Popular posts from this blog

जिल्ह्यातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घ्यावी

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांची शहापूर तालुक्यातील शेणवा प्राथमिक आरोग्य केंद्रास “सरप्राईज व्हिजिट”

विशेष लेख क्र.33 - जिल्हाधिकारी अशोक शिनगारे: लोकसेवेचा दीपस्तंभ