नवीन वाहनाच्या नोंदणीसाठी आरटीओ कार्यालयामध्ये वाहन नेण्याची आवश्यकता भासणार नाही -रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी




नवीन वाहनाच्या नोंदणीसाठी आरटीओ कार्यालयामध्ये वाहन नेण्याची आवश्यकता भासणार नाही
-रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी
            ठाणे दि.27 जिमाका : नवीन वाहनाच्या नोंदणीसाठी आरटीओ कार्यालयामध्ये वाहन घेऊन जाण्याची आवश्यकता भासणार नाही, लवकरच ग्राहक हे काम ऑनलाईन करू शकतील, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
            बस व कार ऑपरेटर्स कॉन्फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने नवी मुंबई येथे आयोजित तीन दिवसीय प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी उपस्थितांना संबोधित करताना श्री. गडकरी म्हणाले की, सरकारमार्फत दळणवळण क्षेत्रामध्ये नवीन तंत्रज्ञान, आधुनिकीकरण, नवीन व्यवसाय, नवीन चालना आणली जात आहे. आता इलेक्ट्रिक बसेसवर फक्त ५% जीएसटी आकारण्यात येणार आहे. प्रवासी वाहतुकीसाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक बसेस, इलेक्ट्रिक कार टॅक्सी, इलेक्ट्रिक रिक्षा आणि इलेक्ट्रिक दुचाकी यांसारख्या कोणत्याही विद्युत वाहनास परमिटची गरज नसेल. 
            वाहनांची नोंदणी ऑनलाईन करून परमिट मिळवता येईल. राज्य सरकारच्या आरटीओकडेच नोंदणी अधिकार असतील, तथापि नोंदणी ऑनलाईन होईल. ऑनलाईन नोंदणी शुल्क भरण्याची जबाबदारी विक्रेत्याची असेल. विक्रेत्याने नोंदणी शुल्क भरल्यानंतर त्यांना राज्य आरटीओकडून नोंदणी क्रमांक मिळेल आणि ग्राहकाच्या वाहनांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल. यामुळे व्यवसायात सुलभता निर्माण होऊन पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त प्रणाली निर्माण होण्यास मदत होईल, असे श्री.गडकरी यांनी नमूद केले.
            सदर प्रसंगी आमदार मंदा म्हात्रे, माजी खासदार किरीट सोमैया आदी मान्यवर उपस्थित होते.
000000

Comments

Popular posts from this blog

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या 39 व्या वर्धापनदिन सोहळ्याचे आयोजन

जिल्ह्यातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घ्यावी

मोघरपाडा कारशेड डेपो मेट्रो मार्गिका 4.4अ, 10 व 11 संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न