उरी द सर्जिकल स्ट्राईक या चित्रपटामुळे विद्यार्थीच्या देश भावना वृध्दींगत
उरी द सर्जिकल स्ट्राईक या चित्रपटामुळे विद्यार्थीच्या देश भावना वृध्दींगत
ठाणे, दि. 26 जिमाका : कारगिल युध्द विजय दिनाचे औचित्य साधून
राज्यातील युवकांमध्ये देशाच्या सैन्याबद्दल कर्तव्य भावना आणि अभिमान वृध्दींगत होण्यासाठी
26 जुलै रोजी सकाळी 10.00 वाजता ठाणे जिल्हयातील 40 चित्रपटगृहांमध्ये “URI-THE SURGICAL STRIKE” हा चित्रपट प्रदर्शित करण्यात
आला. ठाणे जिल्ह्यात 19 हजार 600 विद्यार्थ्यांना हा चित्रपट मोफत दाखवण्यात आला. सदर
चित्रपट प्रदर्शित करण्याआधी सिनेपोलिश चित्रपटगृह,
विवियाना मॉल, ठाणे येथे जिल्हाधिकारी राजेश
नार्वेकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. उदघाटनाच्या वेळी अपर जिल्हाधिकारी
अनिल पवार, उपजिल्हाधिकारी (सा.प्र) अभिजीत
भांडे - पाटील, जिल्हा सैनिक अधिकारी, मेजर प्रांजळ जाधव, करमणूक कर अधिकारी, सर्जेराव मस्के - पाटील हे उपस्थित होते
हा चित्रपट ठाणे जिल्हयातील 18 ते 25 वयोगटातील युवकांना दाखविण्यात
आला. सदर चित्रपटास युवकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला.
Comments
Post a Comment