भातसा नदीच्या तीरावरील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा
भातसा नदीच्या तीरावरील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा
ठाणे दि. 29 (जिमाका): सततच्या पावसामुळे भातसाधरणाच्या
पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे भातसाधरणाचे पाच दरवाजे उघडण्यात येणार आहेत.भातसाधरणातून सुमारे 155
क्युमेक्स विसर्ग प्रवाहित केला जाणार आहे.भातसा नदीच्या तीरावरील शहापूर-मुरबाड
रस्त्यावरील सापगांव पूल ,सापगांव व नदी काठावरील गावांना सतर्कतेच्या सुचना
देण्यात येत आहेत.या काळात कोणत्याही प्रकारे वाहत्या पाण्यात प्रवेश न करण्याचा व दक्षता घेण्याच्या सुचना मुख्य
कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा निवासी उप
जिल्हाधिकारी ठाणे यांनी कळविले आहे.
Comments
Post a Comment