दिव्यांगानी विविध योजनासाठी अर्ज करावेत


दिव्यांगानी विविध योजनासाठी अर्ज करावेत
ठाणे दि.30(जिमाका):समाज कल्याण विभाग व जिल्हा परिषद ठाणे यांच्यामार्फत सन 2019-20 या वर्षात दिव्यांग व्यक्तींसाठी विविध योजना राबविण्यात येणार आहेत. सदर योजना करिता ठाणे जिल्हातील दिव्यांग व्यक्तीनी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद ठाणे यांनी केले आहे.
लघु उद्योगासाठी शारीरिकदृष्टया दिव्यांग व्यकतींना सहाय्य (बीज भांडवल योजना)
दिव्यांग व्यक्तींना स्वत:चा उद्योग सुरु करुन स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिक पुनर्वसन साधता यावे म्हणून रु.150000/- पर्यंतच्या व्यवसायास अनुदान देण्याची योजना आहे. सदरील योजनेद्वारे प्रत्यक्षात 80 टक्के रक्कम बॅक कर्ज आणि 20 टक्के रक्कम समाज कल्याण विभागाकडून बीज भांडवल अनुदान देण्यात येते.
पात्रता व अर्जासोबत जोडण्याची कागदपत्रे :
अपंगत्वाचे प्रमाण 40 टक्के पेक्षा अधिक असावे. वय 18 ते  50 वर्षे च्या दरम्यान असावे. वार्षिक उत्पन्न रु.1,00,000 च्या आत असावे. कोटेशन (व्यवसाय प्रकल्प) रु 1,50,000 पर्यंत असावे. सोबत ज्या जागेत व्यवसाय करावयाचा आहे, त्या जागेचे प्रमाणपत्र प्रस्ताव 2 प्रतीत सादर करावा.सोबत 2 फोटो जोडावेत. रहिवाशी दाखला, दोन प्रतिष्ठित व्यक्तीचे दाखले. सदर अर्ज 31 डिसेंबर पर्यंत स्वीकारले जातील.
शालांतपुर्व शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
शालांतपुर्व शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती (इयत्ता 1 ली ते 10 वी). अपंगत्व 40 टक्के पेक्षा जास्त असावे (सिव्हिल हॉस्पिटलचा दाखला). गतवर्षी गुण पत्रिका, दुसरी कोणतीही शिष्यवृत्ती घेत नाही असा संस्था प्रमुखचा दाखला. एक फोटो(पासपोर्ट साइज). ठाणे जिल्हा मध्यवर्ती बॅकेत विद्यार्थांचा खाते असावे. शिष्यवृत्ती दर तक्ता(सदरील अर्ज 31 ऑगस्ट पर्यंत स्वीकारले जातील.)
शालांत मेट्रिकोत्तर शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृती इयत्ता 11 वी पासुन पुढील उच्च शिक्षण(सदरील अर्ज 31 ऑगस्ट पर्यंत स्वीकारले जातील.)सदर योजनासाठी ऑनलाइन या संकेत स्थळावर माहिती भरुन http://aaplesarkar.mahaonline.gov.in/en सादर करण्यात यावी.
दिव्यांग अव्यंग विवाह योजना
विवाह नोंदणी दाखला. वर वधू यांचे शाळा सोडल्याचे दाखले, वर अथवा वधूचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र, वर वधूचे शिफारस पत्र, दोन प्रतिष्ठित व्यक्तींचे शिफारस पत्र, महाराष्ट्रचे रहिवासी असल्याबाबत अधिवास (Domicile प्रमाणपत्र). सर्व साक्षंकीत प्रती. (सदर अर्ज 31 डिसेंबर पर्यंत स्वीकारले जातील.)
0000000000000000

Comments

Popular posts from this blog

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या 39 व्या वर्धापनदिन सोहळ्याचे आयोजन

जिल्ह्यातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घ्यावी

मोघरपाडा कारशेड डेपो मेट्रो मार्गिका 4.4अ, 10 व 11 संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न