हिरकणी -नवउद्योजक महाराष्ट्राची योजना


हिरकणी -नवउद्योजक  महाराष्ट्राची  योजना       
 दि.31 ठाणे  जिमाका :  महाराष्ट्रातील महिलांमध्ये उद्योजकता आणि नवकल्याण प्रोत्साहित करण्याच्या हेतूने हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राचीयोजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिला बचत गटांच्या नविण्यपूर्ण संकल्पनांना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांना आवश्यक ते मार्गदर्शन करणे, तालुका व जिल्हास्तरावर मंच उपलब्ध करून देणे व उत्कृष्ट नाविन्यपूर्ण संकल्पनांना पायाभूत सुविधा व अर्थसहाय्य करणे तसेच महिला बचतगटांना नवीन कल्पना संकल्पित करण्यासाठी प्रोत्साहीत करणे हे प्रमुख उद्दीष्ट आहे
राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान, राष्ट्रीय शहरी जीवनोन्नती अभियान, महिला आर्थिक  विकास महामंडळ, उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन अभियान या यंत्रणाच्या अंतर्गत तयार केलेले, पंचसूत्रीचे पालन करणारे ग्रामीण आणि शहरी भागातील महिला बचतगट हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राच्या योजनेत पात्र राहतील. खाजगी संस्थाव्दारे स्वंतत्रपणे तयार केलेले गट या योजनेत सहभागी होण्यासाठी पात्र राहणार नाहीत.
योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली समिती तयार करण्यात आली आहे. त्यामध्ये जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हा लिड बँक अधिकारी, जिल्हयातील यशस्वी उद्योजक, गुंतवणूकदार, स्थानिक एनजीओ, जिल्हा कौशल्य विकास कार्यालय यांचे अधिकारी राहतील. ही योजना जिल्ह्यात चार टप्प्यात राबविण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात तालुकास्तरीय माहिती सत्र प्रसिध्द करुन 1 ऑगस्ट पर्यत तालूकास्तरीय माहिती सत्राचे आयोजन करण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात 2 ऑगस्ट या कालावधीत तालुकास्तरीय कल्पना सादरीकरण, तिसरा टप्पा दि.8 ते 10 या तारखेला होईल. जिल्हास्तरीय कल्पना सादरीकरण सत्र, चौथा टप्पा 15 ऑगस्ट रोजी पालकमंत्री महोदय यांचे हस्ते बक्षीस  वितरण सोहळा होणार आहे. अधिक माहितीसाठी दूरध्वणी क्रमांक- 022-25428300  या नंबरवर संपर्क करावा असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ठाणे, यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या 39 व्या वर्धापनदिन सोहळ्याचे आयोजन

जिल्ह्यातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घ्यावी

मोघरपाडा कारशेड डेपो मेट्रो मार्गिका 4.4अ, 10 व 11 संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न