14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालत


14 सप्टेंबर  रोजी राष्ट्रीय लोक अदालत
   ठाणे दि.22 (जिमाका): महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण , मुंबई  यांचे निर्देशानुसार जिल्हा सत्र न्यायालय , ठाणे पालघर जिल्यातील सर्व तालुका न्यायालये , कौटुंबिक न्यायालये , कामगार न्यायालये , सहकार न्यायालये, इतर न्यायालयांमध्ये एन . आर . बोरकर , प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश ठाणे , यांच्या मार्गदर्शनाखाली दि . 14 सप्टेंबर  रोजी सकाळी १० : ३० वाजता राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे .
    राष्ट्रीय लोक अदालतीचे दिवाणी स्वरूपाची , फौजदारी स्वरूपाची , वैवाहिक स्वरूपाची , १३८ एन. आय.क्ट (चेक संबंधिची) अन्वये दाखल झालेली प्रकरणे, बँक वसुली प्रकरणे, मोटर अपघात नुकसान भरपाई प्रकरणे ,कौटुंबिक वाद प्रकरणे , कामगार विषयक वाद , भूसंपादन प्रकरणे , वीज पाणी विषयक देयक प्रकरणे, महसूल प्रकरणे तसेच दाखल पूर्व प्रकरणे  इत्यादी तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत.तरी सर्व पक्षकारांना आवाहन करण्यात येत आहे की आपण या संधीचा फायदा घ्यावा आपली जास्तीत जास्त प्रकरणे लोक अदालतीचे ठेवण्यासाठी ज्या न्यायालयात प्रलंबित असतील त्या न्यायालयाला अर्ज करावा .
 तसेच दाखल पूर्व प्रकरणाबाबत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ठाणे किंवा तालुका विधी सेवा समिती यांच्याकडे अर्ज करावा . तसेच राष्ट्रीय लोकअदालतीबाबत कोणतीही समस्या असेल कोणतीही चौकशी करायची असल्यास खालील नंबरवर  संपर्क साधावा .
 वाशी नवी मुंबई जिल्हा ठाणे - ०२२-२७५८००८२, भिवंडी - ०२५२२-२५०८२८, कल्याण -०२५१-२२०५७७०, मुरबाड - ०२५२४-२२२४३३, शहापूर - ०२५२७- २०७०७७६, उहासनगर - ०२५१-२५६०३८८, पालघर- ०२५२५-२५६७५४, वसई -०२५०- २३२५४८५,वाडा-०२५२६-२७२६७२, डहाणू -०२५२८-२२२१६० ,जव्हार ०२५२०-२२२५६५

      जिल्हा विधी सेवा प्राधिकरण , सेवा सदन पहिला मजला, जिल्हा न्यायालय परिसर ठाणे , येथे येऊन प्रत्यक्ष संपर्क किंवा ोन नंबर ०२२-२५४७६४४१द्वारे संपर्क साधावा .सर्व प्रकरणे सामंजस्याने सोडवण्याकरिता राष्ट्रीय लोक अदालतीचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चे सचिव  एम . आर देशपांडे यांनी केले आहे .   
0000000



Comments

Popular posts from this blog

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या 39 व्या वर्धापनदिन सोहळ्याचे आयोजन

जिल्ह्यातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घ्यावी

मोघरपाडा कारशेड डेपो मेट्रो मार्गिका 4.4अ, 10 व 11 संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न