30 ऑगस्ट रोजी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी निमित्त टाऊन हॉल ठाणे येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन
ठाणे दि. 28 (जिमाका):विश्व विख्यात
साहित्यिक,संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अग्रणी नेते साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ
साठे यांच्या जन्मशताब्दीस दि.01 ऑगस्ट 2019 प्रारंभ झाला असुन येत्या वर्षभरात सामाजिक
न्याय विभागाच्या अंतर्गत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ
यांच्या वतीने राज्यभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.त्याचाच एक भाग
म्हणून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ जिल्हा कार्यालय
ठाणे,सहाय्यक आयुक्त समाज कल्याण ठाणे व समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद ठाणे
यांच्या संयुक्त विद्यमाने दि.30 ऑगस्ट रोजी सकाळी 11.00 वाजता, टाऊन हॉल कोर्ट
नाका ठाणे येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमामध्ये
शाहिरांचा गायन कार्यक्रम,मातंग समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व
स्मृतिचिन्ह देऊन सत्कार व शालेय वस्तुंचे वाटप करण्यात येणार आहे.तसेच सामाजिक
न्याय विभागाच्या वतीने पुरस्कार मिळालेल्या व्यक्तींचे साहित्यरत्न अण्णा भाऊ
साठे पुरस्कार सन 2016-17 ते 2018-19 या कालावधीतील मिळालेल्या मान्यवरांची
शाल,स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात येणार आहे.
अण्णा भाऊ साठेचे विचार
समाजापर्यंत पोहचण्याकरीता वक्त्यांची व्याख्याने
आयोजित केली असुन अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य खंड-1 व खंड -2 वाटप
विद्यार्थी व मान्यवरांना करण्यात येणार आहे.या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित
राहावे असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळच्या जिल्हा
व्यवस्थापक अरुणा जोशी यांनी केले आहे.
Comments
Post a Comment