उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून वाहनांचा जाहीर लिलाव
ठाणे दि. 26 (जिमाका) : उप प्रादेशिक
परिवहन कार्यालय कल्याण येथील वायुवेग पथकामार्फत तपासणी दरम्यान अटकावून ठेवण्यात
आलेल्या 194 वाहनांचा गुरुवार दिनांक 12 सप्टेंबर 2019 रोजी दुपारी 3.30 वाजता
जाहीर लिलाव करून विक्री करण्यात येणार आहे.
या लिलावामध्ये तीन चाकी व चारचाकी वाहनांचा समावेश आहे.
त्यामध्ये बस, ट्रक, रिक्षा सहा आसनी
टॅक्सी, खाजगी वाहने आदींचा समावेश
आहे. लिलावाबाबतच्या अटी व शर्ती कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रदर्शित करण्यात
आल्या असून इच्छुकांनी लिलावात सामील व्हावे, असे आवाहन उप
प्रादेशिक परिवहन अधिकारी कल्याण संजय ससाणे यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment