भारतीय नौसेनेच्या माजी सैनिक,सैनिक विधवा व अवलंबीतासाठी तक्रार निवारण शिबीर
भारतीय नौसेनेच्या माजी सैनिक,सैनिक विधवा व
अवलंबीतासाठी तक्रार निवारण शिबीर
ठाणे दि.22 (जिमाका):ठाणे जिल्ह्यातील भारतीय
नौसेने च्या माजी सैनिक विधवा व अवलंबित यांच्या सर्व प्रकारच्या अडचणीचे निराकरण
करण्यासाठी भा.नौ.पो.हमला ,मार्वे,मालाड (पश्चिम) येथून कमांडर अरुनिमा राजा व
सहकारी यांचे मार्गदर्शन शिबीर दिनांक 24 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता मिलिटरी बॉईज
होस्टेल ठाणे (ज्ञानसाधना कॉलेज शेजारी )येथे आयोजित केले आहे.
जिल्ह्यातील
भारतीय नौसेने च्या सर्व माजी सैनिक,माजी सैनिक विधवा व अवलंबित यांनी तक्रार
निवारणासाठी संबधित कागदपत्रासह हजर राहावे. आपल्या अडचणी सोडवण्यासाठी या संधीचा
जास्तीत जास्त लाभ घ्यावा.अधिक माहितीसाठी 022-25343174/9769664830 या नंबर संपर्क
करावा,असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ठाणे मेजर प्रांजल जाधव (निवृत्त)
यांनी केले आहे.
000000
Comments
Post a Comment