दुचाकी वाहनांसाठी पसंती क्रमांक



ठाणे दि. 28 (जिमाका): प्रादेशिक परिवहन कार्यालय ठाणे  यांच्याकडून दुचाकी वाहनांसाठी MH -04 KC हि नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे .या मालिकेतील पसंती क्रमांक आपल्या वाहनासाठी घेऊ इच्छिणाऱ्या वाहनधारकांचे अर्ज गुरुवार दि . 29  ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते दुपारी 1  या वेळात स्विकारले जातील. पसंती क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास लिलाव पध्दतीने क्रमांक देण्यात येतील. आवश्यक शुल्क भरल्यानंतरच क्रमांक आरक्षित केला जाईल.तसे पत्र कार्यालयामार्फत दिले जाईल हेच पत्र वाहन नोंदणी करताना जोडणे आवश्यक आहे.इच्छुकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी ,ठाणे यांनी केले आहे.
1)      प्रादेशिक परिवहन कार्यालय,ठाणे यांच्या अधिकार कक्षेमध्ये वास्तव्य करणाऱ्या VAHAN या संगणक प्रणालीवर परिवहनेत्तर संवर्गातील वाहने नोंदणी करु इच्छिणाऱ्या धारकांसाठी MH -04 KE ही नवीन मालिका सुरु MH -04  KC मालिका संपले बरोबर  सुरु करण्यात येणार आहे.
2)     महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 54 (अ) अन्वये नवीन नोंदणी मालिकेतील आकर्षक व पसंतीचे नोदंणी क्रमांकासाठी अर्ज करुन आरक्षित करण्यासाठी ईच्छूक जनतेकडून दि.29.08.2019 रोजी सकाळी 10.00 ते 1.00 या कार्यालयीन वेळेमध्ये अर्ज स्विकारले जातील याची नोंद घ्यावी.
3)      आकर्षक व पसंतीच्या क्रमांकासाठी केलेले अर्ज मंजूर झाल्यास अर्जदाराने त्याच दिवशी अथवा दुसऱ्या दिवशी सकाळी 10.00 ते 1.00 या वेळेमध्ये विहित केलेले शुल्क भरणा करणे आवश्यक आहे.
4)    शासनाने अधिसुचित केलेल्या आकर्षक वाहन नोंदणी क्रमांकासाठी शासनाने विहीत केलेले शुल्क वसुल करुन आकर्षक व पसंतीचे क्रमांक देण्यात येतील.
5)     जर एका नोंदणी क्रमांकासाठी एका पेक्षा जास्त अर्ज कार्यालयास प्राप्त झाल्यास पसंती क्रमांक लिलाव पध्दतीने जारी करण्यात येईल.लिलाव पध्दतीने पसंती क्रमांक जारी करण्यासाठी जो पसंती वाहन क्रमांक पाहिजे आहे. त्या नंबरसाठी विहीत  रक्कमेचा असलेला डी.डी सोबत आणावा व लिलावासाठी  वेगळया ऐच्छिक रक्कमेचा डी.डी बंद लिफाफ्यात सोबत आणावा.
6)     आकर्षक पसंतीच्या नोंदणी क्रमांकाची शुल्क भरणा दिनांकापासून 30 दिवसांपर्यत संबधित क्रमांक आरक्षित राहिल.त्या कालावधीत वाहन नोदंणीसाठी मोटार वाहन निरीक्षक यांच्या समोर फॉर्म नंबर 20 मध्ये अर्ज करुन वाहनाची नोंदणी न केल्यास 30 दिवसानंतर सदर क्रमांक अनारक्षित समजला जाईल व भरलेले शुल्क परत केले जाणार नाही.
7)     आकर्षक पसंतीच्या नोंदणी क्रमांकासाठी आवश्यक ते शुल्क भरल्यानंतर क्रमांक आरक्षित केला आहे.याबाबतचे पत्र कार्यालयाकडून दिले जाईल.व ते पत्र वाहन नोंदणी करताना फॉर्म क्रमांक 20 सोबत जोडणे आवश्यक आहे.
8)     आकर्षक व पसंतीच्या क्रमांक महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 54 (अ) नुसार आरक्षित केल्यानंतर सदर आरक्षण क्रमांक हस्तांतरणीय नसल्याने अन्य व्यक्तीच्या नावावर वाहन  नोंदणीस्तव हजर केल्यास आरक्षणाचा वापर करता येणार नाही.

000000


Comments

Popular posts from this blog

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या 39 व्या वर्धापनदिन सोहळ्याचे आयोजन

जिल्ह्यातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घ्यावी

मोघरपाडा कारशेड डेपो मेट्रो मार्गिका 4.4अ, 10 व 11 संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न