मध उद्योग मोफत प्रशिक्षणासाठी अर्ज करावेत



ठाणे दि. 30 (जिमाका): मध उद्योगाच्या मोफत प्रशिक्षणासाठी पात्र व्यक्ती, संस्थाकडुन अर्ज मागण्यात येत आहेत. मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण, साहित्य स्वरुपात 50 टक्के  स्वगुंतवणुक, शासनाच्या हमी भावाने मध खरेदी, विशेष/छंद प्रशिक्षणाची सुविधा, मधमाशा संरक्षक व संवर्धनाची जगजागृती  ही योजनेची वैशिष्टये आहेत.

वैयक्तिक मधपाल : पात्रता-अर्जदार साक्षर असावा, स्वत:ची शेती असल्यास प्राधान्य, वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे.

    केंद्रचालक प्रगतिशिल मधपाल व्यक्ती : पात्रता-किमान 10 पास असावा, वय वर्ष 21 पेक्षा जास्त असावे, व्यक्तीच्या नांवे किंवा त्या व्यक्तीच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नांवे किमान 1 एकर शेत जमीन किंवा भाडे तत्वावर घेतलेली शेत जमीन, लाभार्थीकडे मधमाशा पालन, प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्यांची क्षमता व सुविधा असावी.

केंद्रचालक संस्था : पात्रतासंस्था नोंदणीकृत असावी. संस्थेच्या नावे अथवा भाडे तत्वावर घेतलेली किमान 1000 चौ.फुट सुयोग्य इमारत असावी. संस्थेकडे मधमाशा पालन प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता असावी.

लाभार्थी निवड प्रक्रियेनंतर प्रशिक्षणांपुर्वी मध व्यवसाय सुरु करणेसंबधी मंडळास बंधपत्र लिहून देणे अनिवार्य राहिल. मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेणे अनिवार्य आहे. अधिक माहितीसाठी संचालक, मध संचालनालय, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, शासकीय बंगला नं 5, मु.पो.ता.महाबळेश्वर, जि.सातारा-412806 दुरध्वनी 02168-260264 किंवा जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, लक्ष्मी विष्णू सदन, महर्षि कर्वे रोड, नौपाडा, ठाणे-400602 दुरध्वनी-25366075 या कार्यालयाशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी ठाणे यांनी केले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या 39 व्या वर्धापनदिन सोहळ्याचे आयोजन

जिल्ह्यातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घ्यावी

मोघरपाडा कारशेड डेपो मेट्रो मार्गिका 4.4अ, 10 व 11 संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न